‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटातून आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ‘‘धर्मवीर २’ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नुकताच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला. हा चित्रपट अनेकांना आवडलेला नाही असे म्हणत आता फायनल ऑथॉरिटी मीच असा टोला शिंदे यांनी लगावला. शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा टोला लगावल्याचं सांगण्यात येतंय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चित्रपटाच्या शुटिंगच्या मुहूर्तच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्लॅपदेत चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. माध्यमांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “लवकरच ‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’चा दुसरा भाग हिंदीत देखील यायला हवा. मला अनेकदा लोकं ‘पिक्चर हिंदी मे बनाओ’ असं म्हणाले आहेत. चित्रपट केवळ महाराष्ट्र पुरताच मर्यादित राहणार नाही, याची निर्मात्यांनी काळजी घ्यावी, असेही शिंदे यांनी नमूद केलं.
अनेकांना हा चित्रपट पाहताना त्यातले सीन्स, मुद्दे आवडलेले नाही. अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी सांगितली. आता चित्रपट कोणाला आवडो न आवडो आता फायनल ऑथोरीटी मी आहे, असेही शिंदे म्हणालेत. धर्मवीर चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.
शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू होतो. हा सीन आपल्याला पहावला नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. पण या सिनेमात राज ठाकरे आणि नारायण राणे असल्याने उद्धव ठाकरे यांनी पूर्ण चित्रपट पाहिला नाही अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. आता एकनाथ शिंदे यांनीही अशाच प्रकारे टोला लगावलाय. त्यामुळे शिंदे यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्यावरच होता असंही सांगितलं जातंय.
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “चित्रपटाचा पहिला भाग बनवताना दिग्दर्शकांच्या विरोधात काही गोष्टी झाल्या. काही कलाकार सर्किट असतात, सर्किट म्हणजे वेडे. मग गोड बोलून बोलून त्यांच्या पाठिमागे लागावे लागते. दिघे साहेबांवर चित्रपट बनवण्याचा करण्याचा उत्साह सर्व या कलाकार मंडळींनी दाखवली. त्यांचं कार्य प्रचंड आहे. त्यांच्या बायोपिकचे किती भागात येतील हे मला सांगता येणार नाही. सत्ता, संपत्ती, अधिकाराचा वापर आपण सर्वसामान्य लोकांसाठी केला पाहिजे. चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये मी नगरविकासमंत्री म्हणून दिसलो होतो. आता दुसऱ्या भागामध्ये मी मुख्यमंत्री म्हणुन दिसणार आहे.”
‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर ‘धर्मवीर २’ आणि पुढे ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ अशी टॅगलाईन दिलेली दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. येत्या ९ डिसेंबरपासून ठाणे येथे चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. चित्रपटामध्ये कलाकार कोण असणार? हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ‘धर्मवीर २’ या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटातून उलगडली जाणार म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.