अखेर देवमाणूस 2'चा मुहूर्त ठरला! किरण गायकवाड या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला Saam Tv
मनोरंजन बातम्या

अखेर देवमाणूस 2'चा मुहूर्त ठरला! किरण गायकवाड या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' (Devmanus) या सिरियलने लोकप्रियतेचे चांगलेच शिखर गाठले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' (Devmanus) या सिरियलने लोकप्रियतेचे चांगलेच शिखर गाठले आहे, आणि प्रेक्षकांना टीव्हीच्या स्क्रीनसमोरच खिळवून ठेवत. आता या सिरीयलमध्ये रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसायचे. या सीरियलमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचे देखील प्रचंड कौतुक करण्यात येत असत.

हे देखील पहा-

त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केले आणि 'देवमाणूस' (Devmanus) मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांचे (audience) मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. मालिकेचा जेव्हा शेवट झाला, त्या वेळेस मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची देखील वाट बघत आहेत. आता तो क्षण लवकरच येणार आहे. 'देवमाणूस' परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मालिकेचा दुसऱ्या भागाचा टीझर प्रेक्षकांनी पाहिला आणि सोशल मिडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले. हा नवीन सिझन लवकरच सुरू होणार असून यातील कलाकारांची माहिती अजूनही देखील गुलदस्त्यामध्येच आहे. तसेच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता (Actor) किरण गायकवाड याचा लूक या नवीन भागात कसा असणार आहे, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना चांगलीच लागली आहे.

'ती परत आलीये' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याऐवजी 'देवमाणूस २' मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. "देवमाणूस २" चा महाआरंभ, १ तासाचा विशेष भाग रविवारी १९ डिसेंबर दिवशी रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर २० डिसेंबर पासून दर सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर ही सिरीयल प्रसारित होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Video : लोकसभेत गदारोळात मला मारहाण केली, जोरात ढकललं; महिला खासदाराचे केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Online Gaming Regulation Bill: ऑनलाइन गेमिंगचा सरकारकडून 'गेम'; दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

SCROLL FOR NEXT