Asmita deshmukh Fraud Saam Tv
मनोरंजन बातम्या

Asmita deshmukh: 'देवमाणूस' फेम अभिनेत्रीची फसवणूक; सेलिब्रिटींना विनंती करत केले सतर्कतेचे आवाहन

Asmita deshmukh Fraud: ‘देवमाणूस’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्री अस्मिता देशमुख अलीकडेच आर्थिक फसवणुकीची शिकार झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Asmita deshmukh Fraud: ‘देवमाणूस’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्री अस्मिता देशमुख अलीकडेच आर्थिक फसवणुकीची शिकार झाली आहे. स्वतः अस्मिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या घटनेबाबत माहिती दिली असून तिच्या व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये आणि मराठी कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना एका दहीहंडी कार्यक्रमाशी संबंधित आहे. अस्मिता देशमुखला या कार्यक्रमासाठी इव्हेंट मॅनेजर सुजित सरकाळे यांनी संपर्क साधला होता. नेहमीप्रमाणे, कलाकार जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावतात तेव्हा मानधनाची खात्री करून घेतात. अस्मिताने देखील तशी खात्री मागितली होती. त्यावर आयोजकांकडून तिला मानधन दिल्याचा एक स्क्रीनशॉट पाठवला. या स्क्रीनशॉटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचे दाखवले गेले होते. मात्र प्रत्यक्षात तिच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा झाला नव्हता.

पैसे न मिळाल्याची शंका अस्मिताला आली तेव्हा तिने सरकाळेंशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी “सर्व्हर डाऊन आहे”, “बँकेकडून उशीर होतोय”, “तांत्रिक अडचण आहे” अशा सबबी सांगून तिला काही दिवस वाट पाहण्यास सांगितले. अस्मिताने संयम ठेवला आणि काही दिवस थांबली देखील, पण तरीही पैसे आले नाहीत.

यानंतर तिने वारंवार संपर्क करून पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु अनेकदा समजावून सांगूनही पैसे मिळाले नाहीत. शेवटी तिने या प्रकरणाची पोलिसांत तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांकडे तक्रार करूनही फारसा काही उपयोग झाला नाही, असे अस्मिताने सांगितले. या व्हिडिओत अस्मिताने स्पष्टपणे सांगितले की, आजकाल अनेक कार्यक्रम आयोजक गुगलपे, फोनपे, पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट अॅप्सचा वापर करून बनावट स्क्रीनशॉट पाठवतात आणि कलाकारांची फसवणूक करतात. त्यामुळे कलाकारांनी फसवणुकीपासून वाचण्यासाठी मानधन प्रत्यक्ष खात्यात जमा झाले आहे का, याची खात्री करणे अत्यावश्यक आहे.

अस्मिताने इतर कलाकारांना देखील आवाहन केले की, कुठल्याही इव्हेंटमध्ये जाण्याआधी आयोजकांची चौकशी करूनच करार करावा आणि फक्त स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नये. तिच्या या अनुभवामुळे पुन्हा एकदा कलाकारांच्या आर्थिक सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT