'देवमाणूस 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; पहा पहिली झलक Saam Tv
मनोरंजन बातम्या

'देवमाणूस 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; पहा पहिली झलक

झी मराठी वाहिनीवर 'देवमाणूस' या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचे चांगलेच शिखर गाठले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झी मराठी वाहिनीवर 'देवमाणूस' Devmanus या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचे चांगलेच शिखर गाठले होते. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती देखील अधिक मोठ्या प्रमाणात दर्शवली होती. ऑगस्ट महिन्यामध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

हे देखील पहा-

आता ही मालिका एका नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देवमाणूस २' या नव्या मालिकेची पहिली झलक किरण गायकवाड ने इंस्टाग्रामवरती शेअर केली आहे. या मालिकेचा प्रोमोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वज्र प्रोडक्शन्स निर्मित 'देवमाणूस' या एका वेगळ्या धाटणीच्या सिरियलने आपल्या लोकप्रियतेने छोट्या पडद्यावर टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले आहे. 'देवमाणूस' या मालिकेने ऑगस्ट महिन्यामध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

मात्र, आता 'देवमाणूस २' पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून त्याला पुन्हा एकदा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT