Dev Anand's 100th birth anniversary Saam TV
मनोरंजन बातम्या

Dev Anand 100th Birth Anniversary: 'देव आनंद यांनी काळा कोट घालू नये' कोर्टाने दिलेला आदेश; काय होतं नेमकं प्रकरण?

Dev Anand: देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ साली झाला.

Pooja Dange

Dev Anand And His Black Coat:

दिग्गज अभिनेते देव आनंद यांची आज १००वी जयंती आहे. देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ साली झाला. देव आनंद यांनी १९४६साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला पण त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

देव आनंद यांनी त्यांच्या स्टाईल आणि हटके अंदाजाने फॅन्सच्या हृदयात स्वतःचे वेगळे आणि अढळ स्थान निर्माण केले आहे. देव आनंद यांची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. आजही त्यांचे अनेक चाहते आहेत.

जिद्दी, नौ दो ग्यारह, हम दोनों, जॉनी मेरा नाम, सीआयडी, महाल, हरे कृष्ण हरे राम, गाईड, आणि कालापानी या चित्रपटातील अप्रतिम अभिनयाने देव आनंद यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

देव आनंद यांचा चित्रपटातील रोमान्स पाहून त्या काळी मुली त्यांच्यासाठी पार वेड्या झाल्या होत्या. देव आनंद यांना त्यांचे फॅन्स प्रेमाने 'देव साहब' म्हणायचे. त्यांचा सफेद शर्ट आणि काळ्या कोट हा लूक खूप प्रसिद्ध होता. त्यांना या लूकमध्ये पाहून मुली त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायच्या. देव आनंद यांच्या काळ्या कोटाचे मुलींमध्ये इतके आकर्षण होते की, कोर्टाने त्यांच्या या कोट घालण्यावर बंदी घातली होती.

देव आनंद यांनी ६ दशकं सिनेसृष्टीवर त्यांच्या अभिनयाने राज्य केलं. देव आनंद यांच्या अभिनय आणि संवाद कौशल्यावर प्रेक्षक फिदा होते. देव आनंद त्यांच्याकडे त्याकाळी फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जायचे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या फॅन्स कोणत्याही थराला जायला तयार असायचे.

देव आनंद त्यांच्या काळ्या कोटामुळे खूप चर्चेत असायचे. देव आनंद साहेब काळा कोट घालून पब्लिक प्लेसमध्ये जायचे तेव्हा त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. देव आनंदचा काळा कोट आणि पांढरा शर्ट इतका लोकप्रिय झाला की त्याकाळी प्रत्येकजण त्यांचा हा लूक कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा, पण देव आनंदच्या लूकसमोर कोणीही टिकू शकले नाही.

देव आनंद जेव्हा सार्वजनिक ठिकाणी काळा कोट घालून बाहेर जायचे तेव्हा मुलींची एकच गर्दी व्हायची. एवढेच नाही तर ती मुली त्यांच्यासाठी छतावरून उडी मारण्याच्याही तयार व्हायच्या. परंतु देव आनंद यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट खोटी असल्याचे म्हटले होते.

देव आनंदसाठी फॅन्स प्रेम पाहून कोर्टाने पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्याच्या पेहरावात हस्तक्षेप केला होता. न्यायालयाने देव आनंद यांना सार्वजनिक ठिकाणी काळा कोट घालण्यास बंदी घातली होती.

देव आनंद यांनी 1946 मध्ये 'हम एक हैं' या चित्रपटातून त्यांच्या करिअरची सुरुवात केली पण हा चित्रपट फार चालला नाही, पण 1948 मध्ये देव आनंदच्या 'जिद्दी' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. देव आनंद 'जिद्दी'मुळे स्टार झाले. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT