Desi girl Priyanka Chopras husband Nick Jonas has shared some photos on his Instagram handle Saam Tv
मनोरंजन बातम्या

देसी गर्ल प्रियांका चोप्राचा निकसोबत रोमान्स; बोटिंगचाही लुटला आनंद

देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनसने त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हे कपल लेक टाहोच्या मध्यभागी रोमँटिक पोझ देताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्राचा(Priyanka Chopra) पती निक जोनसने (Nick Jonas) त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हे कपल लेक टाहोच्या मध्यभागी रोमँटिक पोझ देताना दिसत आहे. प्रियांकासोबत घालवलेल्या या सुंदर क्षणांना निक जोनसने 'मॅजिकल टायमिंग ' म्हटले आहे. याआधी प्रियांका चोप्रा एका व्हिडिओमध्ये गोल्फ खेळताना निक जोनसला चीअर करताना दिसली होती. या कपलच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली होती. आता चाहते त्यांच्या नवीन फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

निक जोनसने प्रियांकासोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'मॅजिकल टायमिंग' असे म्हणत, रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. निकच्या कॅप्शननुसार, या जोडप्याचे हे मनमोहक फोटो लेक टाहो येथील आहेत. जिथे या कपलने एकमेकांसोबत अविस्मरणीय वेळ घालवल्याचे या फोटोतून पाहायला मिळत आहे.

निकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, प्रियांका-निक तलावाच्या मध्यभागी बोटीवर रोमँटिक पोझ देताना दिसत आहेत. या कपलच्या लूकबद्दल बोलायचे तर देसी गर्ल केशरी रंगाच्या जम्पसूटमध्ये दिसत आहे. तिने ब्लॅक जॅकेट कॅरी करून तिचा लूक पूर्ण केला. दुसरीकडे, निक ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. फोटोंमध्ये हे कपल बोटिंगचा आनंद घेताना दिसत आहे.

प्रियांका चोप्रा अनेक दिवसांपासून लॉस एंजेलिसमध्ये आहे. ती तिथं पती निक जोनससोबत राहत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने आपल्या मुलीचे मालती मेरीचे जोरदार स्वागत केले. मुलीच्या जन्मानंतर प्रियांका सतत चर्चेत असते. याशिवाय, प्रियांका सोशल मीडियावर सतत तिचे मनमोहक फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांची मने जिंकत असते.

प्रियांका चोप्रा लवकरच 'टेक्स्ट फॉर यू' या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे लेखिका शिल्पी सोमाया गौडा यांच्या 'द सिक्रेट डॉटर' या कादंबरीवर आधारित एक चित्रपटही आहे. ज्यामध्ये ती सिएना मिलरसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर ती फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Son Of Sardaar 2 : ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार २' ओटीटीवर कुठे पाहता येणार?

Honda Bike: होंडाने लाँच केली स्वस्त बाईक; Hero Xtreme ला जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maharashtra Live News Update : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे त्र्यंबकेश्वर दर्शनाला

Cyber Crime News : टेलिग्रामवर नोकरीचं आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक; मुंबईतील धक्कादायक घटना

Kumbha Rashi : कुंभ राशीचे भाग्य आज उजळणार, गरिबी होणार दूर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT