Demand Refund After Watching Shah Rukh Khan Jawan Instagram
मनोरंजन बातम्या

Viral Video: ‘जवान’ पाहिल्यानंतर थिएटरबाहेर राडा, प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे मागितले परत; धक्कादायक कारण आलं समोर...

Chetan Bodke

Demand Refund After Watching Shah Rukh Khan Jawan

ॲटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ची प्रेक्षकांमध्ये भलतीच क्रेझ पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांतच २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझ एकट्या भारतात नसून जगभरात कायम पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. चित्रपटाची कथा सर्वत्र इतका चर्चेचा विषय ठरत असली तरी, एक तरूणी थिएटर मालकाकडून पैसे का मागते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या व्हायरल व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा होत आहे.

जवान चित्रपटाचा शो सुरु असताना थिएटरमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सहार रशीद या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सहार आपल्या व्हिडीओमध्ये म्हणते, “ ‘जवान’च्या इंटर्व्हल नंतरचा भाग आम्हाला आधीच दाखवला, आणि चित्रपट संपला. चित्रपट संपल्यानंतर आम्हाला इंटर्व्हलचा मेसेज दिसला. आम्ही सर्वांनी एकच विचार केला, व्हिलन मेला आणि आता इंटर्व्हल कसा काय असेल? नंतर आमच्या लक्षात आलं की, आम्हाला चित्रपटाचा पहिला भाग दाखवण्यातच आला नाही. त्यांनी आम्हाला डायरेक्ट इंटर्व्हलच्या नंतरचाच चित्रपट दाखवला. हे असं आमच्यासोबत पहिल्यांदाच घडलं आहे.” (Bollywood Film)

व्हिडीओमध्ये सहार रशिद सांगते, चित्रपट पाहायला आलेल्या सर्वांनीच थिएटर मालकाकडून पैसे परत हवी असल्याची मागणी केली आहे. सहारने या शेअर केलेल्या व्हिडीओला काही मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे.

एक युजर म्हणतो, ‘क्लायमॅक्स कळाला असेल, रहस्य कळालं असेल, पण तुम्हाला चित्रपटाचा विषय समजला नसेल.’ तर आणखी एकजण म्हणतो, ‘हे प्रकरण जितकं मजेशीर आहे, तितकंच विचित्र ही आहे.’ तर आणखी एका युजरने सांगितले की, ‘हा भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे, आणि तो खराब केल्याबद्दल त्यांच्यावर खटला दाखल करा, ज्याचे रिफंड त्या अनुभवाबरोबर नाही, जो तुम्ही सर्वांनी मिस केला आहे.’

एकंदरीत चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने सहाव्या दिवशी २६.०५ कोटींचा आकडा गाठला आहे. या चित्रपटाने हिंदी व्हर्जनमध्ये २४ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. बाकीच्या भाषेमध्ये चित्रपटाने उर्वरित कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत ३४५. ५८ कोटींचा टप्पा गाठलाय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास १० चित्रपटांचा रेकॉर्डमोडित काढला होता.

चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. चित्रपट ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ प्रदर्शित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT