Delhi High Court on Aishwarya Rai Case: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतीच न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जात तिने म्हटले होते की तिचे फोटो आणि नाव चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहे, जे तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे. ऐश्वर्याचा आरोप होता की तिची प्रतिमा, व्यक्तिमत्व आणि एआय जनरेटेड चित्रे तिच्या परवानगीशिवाय व्यावसायिकरित्या वापरली जात आहेत. आता न्यायालयाने तिला दिलासा दिला आहे.
ऐश्वर्या राय बच्चनला दिलासा देताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की व्यक्तिमत्व अधिकारांचे उल्लंघन सेलिब्रिटीची प्रतिष्ठा कमी करते. त्यांच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व अधिकारांचे रक्षण करण्याबद्दल बोलताना न्यायालयाने म्हटले आहे की जेव्हा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची ओळख त्याच्या संमतीशिवाय किंवा परवानगीशिवाय वापरली जाते, तेव्हा ते केवळ त्याला व्यवसायात नुकसान नाही तर वैयक्तिक नुकसान देखील होते.
न्यायालयाने या प्रकरणात काय म्हटले?
न्यायाधीश तेजस कारिया यांनी स्पष्ट केले की व्यक्तींचे व्यक्तिमत्व अधिकार म्हणजे त्यांची प्रतिमा, नाव, समानता किंवा व्यक्तिमत्त्वाच्या इतर गुणधर्मांचे शोषण नियंत्रित आणि संरक्षित करण्याचा अधिकार व्यक्तीच्या परवानगी शिवाय याचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.
याव्यतिरिक्त, न्यायालयाने प्रतिवादींना कृत्रिम बुद्धिमत्ता, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, डीपफेक, फेस मॉर्फिंग वापरून कोणत्याही माध्यमातून कोणतेही उत्पादन तयार करण्यास, शेअर करण्यास किंवा प्रसारित करण्यास मनाई केली. या आदेशाची सूचना मिळाल्यापासून ७२ तासांच्या आत न्यायालयाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि गुगलला याचिकेत नमुद केलेल्या URL काढून टाकण्याचे आणि ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
एआयमुळे नुकसान होत आहे
सुनावणीदरम्यान, ज्येष्ठ वकील संदीप सेठी यांनी ऐश्वर्या राय बच्चन यांच्या वतीने युक्तिवाद केला ते म्हणाले, तिची प्रतिमा लोक केवळ वस्तू विकण्यासाठीच नव्हे तर अश्लील गोष्टींसाठी देखील वापरत आहेत. हे धक्कादायक आहे. तिचे मॉर्फ केलेले फोटो वापरले जात आहेत. हे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरून केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.