Deepika Padukone And Badminton  Instagram @deepikapadukone
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिका पापाराझींना सवाल करत म्हणते, 'पठान'चा ट्रेलर पाहिलात का?

सध्या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरु असून नुकतीच अभिनेत्री दीपिका पदुकोण विमानतळावर पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

Chetan Bodke

Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या आगामी 'पठान' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि जॉन अब्राहम असून हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. कालच 'पठान'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद देत आहे.

सध्या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरु असून नुकतीच अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबई विमानतळावर दिसली. यादरम्यान ही अभिनेत्री पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या तिचे हे प्रमोशन दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. यावेळी तिने राखाडी रंगाची लाँग हुडी घातली असून ती खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने साधी हेयरस्टाईल केली आहे, आणि सोबतच काळा चष्मा घातलेला आहे.

यावेळी तिने पापाराझींसोबतही (Cameramans) संवाद साधला. संवाद साधताना तिने चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का असा सवाल केला. यावेळी पापाराझींनी दीपिकाच्या प्रश्नाला 'हो' म्हणत उत्तर दिले आहे. यावेळी त्यांचे उत्तर ऐकून दीपिकाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सध्या दीपिकाची स्टाईल आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटोपाहून युजर्सने लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर फेकले कांदे; नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला|VIDEO

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

Saam Impact : बिअरबारमध्ये सरकारी काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन! मुख्यमंत्र्यांचे आदेश; साम टीव्हीचा दणका

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या १००० कोटीची प्रॉपर्टी जप्त करा; रोहित पवारांची मागणी

SCROLL FOR NEXT