L&T चे चेअरमन एसएन सुब्रमण्यम सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात त्यांनी कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे, असं सांगितलं आहेत. मी कर्मचाऱ्यांना रविवारी कामावर बोलवत नाही, याचा मला पश्चात्ताप होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर दीपिका पदुकोन संतापली आहे. (Deepika Padukone On 90 Hours Working)
L&T चे चेअरमन एसएन सुब्रमण्यम यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतक्रिया दिल्या आहेत. याआधी इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम करण्याला सल्ला दिला होता. त्यानंतर आता सुब्रमण्यम यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.
L&T चे चेअरमन एसएन सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री दीपिका पदुकानने नाराजी व्यक्त केली आहे. दीपिका पदुकोनने फये डिसूझा यांची पोस्ट शेअर करत त्यावर आपले मत मांडले आहे. दीपिकाने पोस्टवर लिहलंय की, एवढ्या मोठ्या पदावरील लोक अशी विधाने करतात हे पाहून धक्का बसला. त्यानंतर दीपिकाने #MentalHealthMaatters असंही म्हटलं आहे. (Deepika Post On L&T Chairman subramanyam)
L&T चे चेअरमन नेमकं काय म्हणाले?
लार्सन अँड टुर्बोचे चेअरमन सुब्रमण्यम यांना कर्मचाऱ्यांना शनिवारीदेखील कामावर का बोलावतात असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, रविवारी मी तु्म्हाला काम करायला लावत नाही, याचा मला पश्चात्ताप होतो. मी रविवारीसुद्धा काम करतो. घरी बसून तुम्ही काय करता, पत्नीकडे पाहत किती वेळ घालवता? किंवा पत्नी तुमच्याकडे बघून किती वेळ घालवते? त्यापेक्षा तुम्ही ऑफिसमध्ये या आणि कामाला लागा, असं त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.