Fact Check : तुमच्या पोस्ट खात्यातून कोण काढतंय पैसे? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा सविस्तर

Viral scam message post office bank : तुम्ही पोस्टात पैसे गुंतवलेयत का? तुमचे पोस्टातले पैसे गायब होऊ शकतात...तुमच्या पैशांवर कुणाची तरी नजर आहे...? हे आम्ही का म्हणतोय ? त्यासाठी हा रिपोर्ट आवर्जून पाहा...
Post Office
Post OfficeSaam Tv
Published On

तुमचे पैसे खात्यातून गायब होऊ शकतात असा मेसेज व्हायरल होतोय...कारण, तुमचं पोस्ट बँक खातंच बंद होईल असा दावा करण्यात आलाय...मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, प्रिय ग्राहक, तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते आज ब्लॉक करण्यात आले आहे. कृपया तुमचे पॅनकार्ड त्वरित अपडेट करा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा'. असा मेसेज व्हायरल होतोय...या मेसेजसोबत लिंकही दिली असल्याने अनेकजण या मेसेजवर विश्वास ठेवतायत...मात्र, खरंच पोस्ट पेमेंट बँक खात्यासाठी पॅनकार्ड अपडेट केलं नाही तर खातं ब्लॉक होणार का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

पोस्ट ऑफिस गावागावात आहेत...अनेक योजनेत लहानग्यांच्या नावाने ते वृद्धांपर्यंत पैसे गुंतवलेत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आमचे प्रतिनिधी थेट पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचले...त्यांना व्हायरल मेसेज दाखवला...आणि याची सगळी माहिती जाणून घेतली...

Post Office
Viral News: ..नो रोमान्स, ही रिक्षा आहे ओयो नाही.. ऑटो ड्रायव्हरची त्या कपल्ससाठी वॉर्निंग देणारी पाटी, चर्चा तर होणारच!

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

साम इन्व्हिस्टिगेशन

पोस्टाच्या नावाने व्हायरल मेसेजची लिंक उघडू नका

पोस्टच नव्हे तर कोणतीही बँक लिंक पाठवत नाही

लिंक पाठवून अकाऊंटचे डिटेल्स चोरले जातात

लिंक उघडून पाहिल्यास सायबर गुन्हेगार पैसे काढतात

तुमच्या खात्यातील पैसे गायब होऊ शकतात

त्यामुळे असे मेसेज आले तर काय काळजी घ्यायला हवी हेदेखील पाहुयात...

Post Office
Viral Video: बस स्थानकात शालेय विद्यार्थ्यांच्या तुफान राडा, भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी एकमेंकाना तुडवले; VIDEO व्हायरल

काय काळजी घ्यावी?

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका

ऑफिशिअल पोस्टाचं अॅप वापरा

पासवर्ड आणि अॅप अपडेट करा

पब्लिक वायफायचा वापर करू नका

अॅप वापरून झाल्यावर ते लॉगऑऊट करा

त्यामुळे तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक करत असाल तर सावध राहा...आमच्या पडताळणीत आलेल्या लिंकवरून पॅन अपडेट केलं नाही तर पोस्ट बँक खातं बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला

Post Office
Viral Video: मौत को छूकर टक से वापस! फलाट अन् रेल्वेच्या कचाट्यात सापडला;थरारक Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com