Deepika Padukone : 'या' ५ सुपरहिट चित्रपटांमधून दीपिका पदुकोण एका रात्रीत बाहेर पडली, आजही होते खंत !

Deepika Padukone : 'पठाण' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट करणाऱ्या दीपिका पदुकोणने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. पण दीपिकाला आजही हे चित्रपट गमावल्याचे दु:ख होते.
Deepika Padukone
Deepika PadukoneSaam Tv
Published On

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने अनेक चित्रपट केले आहेत. तिने तिच्या कारकिर्दीत असे अनेक सुपरहिट चित्रपट केले ज्यात तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. दीपिकाचे शेवटचे दोन रिलीज 'पठाण' आणि 'कल्की 2898 एडी' होते आणि ते दोन्ही सुपरहिट चित्रपट ठरले. दीपिका इंडस्ट्रीतील हायपेड अभिनेत्रींच्या यादीत येते, परंतु तिच्यासोबतही एका रात्रीत चांगल्या चित्रपटांमधून बाहेर काढण्याचे किस्से घडले आहेत.

दीपिका पदुकोणच्या हातून हे 5 सुपरहिट चित्रपट आले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण 'सावरिया' साठी कास्ट होणार होती आणि संजय लीला भन्साळी यांनीही तिच्याशी चर्चा केली होती, पण दीपिकाने फराह खानचा चित्रपट आधीच साइन केला होता, त्यामुळे हा चित्रपट तिला गमाववा लागला. याशिवाय अनेक चित्रपट सुद्धा तिच्या हातून गेले आहेत पण इथे त्या चित्रपटांचा उल्लेख करत केला आहे जे सुपरहिट ठरले.

'रॉकस्टार' (२०११)

इम्तियाज अलीचा सुपरहिट चित्रपट रॉकस्टारमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. दीपिकाने एकदा सांगितले होते की तिला या चित्रपटात काम करायचे आहे, परंतु निर्मात्यांनी नर्गिस फाखरीला कास्ट केले.

'जब तक है जान' (२०१२)

यश चोप्राच्या शेवटच्या चित्रपट जब तक है जानमध्ये दीपिकाला कतरिनाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र तारखांच्या गोंधळामुळे कतरिनाला हा चित्रपट मिळाला आणि दीपिकाला हा चित्रपट गमावावे लागले. तिला यश चोप्राचा चित्रपट करायचा होता पण तसे होऊ शकले नाही असे तिने सांगितले.

'प्रेम रतन धन पायो' (२०१५)

सूरज बडजात्याच्या या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. सोनम कपूरच्या आधी या चित्रपटात दीपिकाला पसंती मिळाली होती, मात्र तारखांच्या कमतरतेमुळे सोनमला ती ऑफर करण्यात आली आणि तिने होकार दिला.

'सुलतान' (२०१६)

अली अब्बास जफरच्या सुलतान या सुपरहिट चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. यामध्ये अनुष्का शर्माच्या जागी दीपिकाला घेण्यात येणार होते पण दीपिकाच्या आधी अनुष्काला विचारण्यात आले आणि तिने होकार दिला.

‘गंगुबाई काठियावाडी’ (२०२२)

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ सुपरहिट चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. रिपोर्ट्सनुसार, भन्साळींनी आधी दीपिकाला हा चित्रपट ऑफर केला होता पण नंतर आलियाला कास्ट करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com