Deepika Padukone Instagram @deepikapadukone
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: दीपिकाचा आत्तापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार; बिकीनीमधल्या किलर लूकने वाढवलं इंटरनेटचं तापमान

पठाण चित्रपटामधील दीपिकाचा हॉट अवतार, शाहरुखने म्हटले अभिनेत्रीला ग्लॅमरस.

Pooja Dange

Deepika Padukone Bikini Look In Pathaan: बॉलिवूड सुपस्टार शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान ५ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिका साकारणार आहेत. जशी या चित्रपटाची चर्चा आहे तशीच चर्चा अभिनेत्री दीपिका पदुकोणची होत आहे. दीपिकाच्या भूमिकेविषयी रोज नव-नवीन गोष्टी प्रेक्षकांसमोर येत आहेत.

फिल्ममेकर आदित्य चोपडा आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे पठाण चित्रपटातील गाणे 'बेशरम रंग' प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहेत. या गाण्याविषयी माहिती देणारी पोस्ट अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केली आहे. दीपिकाने तिचा एक बोल्ड फोटो शेअर करत 'बेशरम रंग' गाणे कधी प्रदर्शित होणार याबद्दल तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. (Deepika Padukone)

दीपिकाने या फोटोमध्ये पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. तसेच तिची घायाळ करणारी नजर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये दीपिकानाइ लिहिले आहे, 'बेशरम रंग' १२ डिसेंबरला ११ वाजता प्रदर्शित होणार आहे. दीपिकाने या पूर्वीही तिचा या गाण्यातील लूक शेअर केला होता. त्या फोटोमध्ये सुद्धा दीपिका सोनेरी रंगाच्या बिकिनीमध्ये एकदम हॉट दिसत होती. (Movie)

चित्रपटाचा दिग्दर्शक यांनी दीपिकाविषयी बोलताना सांगितले की, “दीपिका पदुकोण ही एक उत्तम अभिनेत्री असून तिने तिच्या प्रत्येक चित्रपटानुसार प्रगती केली आहे आणि ती आपल्या देशातील सर्वात हॉट अभिनेत्री देखील आहे. ती कमजोर असली तरी ती खूप धाडसी आहे. त्यामुळे, जेव्हा तुम्ही एखाद्या कलाकाराला चित्रपटात कास्ट करता, तेव्हा तुम्हाला त्यांना पूर्ण न्याय मिळेल अशा पद्धतीने सादर करावे लागते.

मला तिचा आतापर्यंतच्या सर्वात हॉट अवतारात सादर करायचे होते. टीम आणि माझ्यासाठी ते एक मिशन बनले होते. म्हणून, बेशरम रंगसाठी आम्ही युरोपमधील समुद्रकिनारी असलेल्या शहरात शाहरुख खानसोबत नृत्य करताना दीपिका पदुकोण पडद्यावर किती हॉट असू शकते हे कॅप्चर करायचे ठरवले. जेव्हा तुम्ही हे अप्रतिम गाणे पहाल तेव्हा त्याचा परिणाम तुम्हाला दिसेलच." पठाण 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT