Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : रविवारी अजय देवगण झाला मालामाल; 'दे दे प्यार दे 2' ची बक्कळ कमाई, 'द गर्लफ्रेंड' अन् 'हक'नं किती कमावले?

De De Pyaar De 2 Box Office Collection Day 3 : सध्या थिएटरमध्ये 'दे दे प्यार दे 2', 'द गर्लफ्रेंड' आणि 'हक' हे चित्रपट पाहायला मिळत आहे. रविवारी कोणी किती कमावले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

रश्मिका मंदानाचा 'द गर्लफ्रेंड' चित्रपट 7 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे.

'दे दे प्यार दे 2' चित्रपट अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे.

अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा एक रोमँटिक-कॉमेडी ड्रामा आहे. त्याचसोबत थिएटरमध्ये रश्मिका मंदानाचा 'द गर्लफ्रेंड' आणि इमरान हाश्मीचा 'हक' चित्रपट दिसत आहे. रविवारी चित्रपटाने किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात. मीडिया रिपोर्टनुसार 'दे दे प्यार दे 2'ने 30 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'दे दे प्यार दे 2' कमाई

Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाने रविवारी 13.75 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाने तीन दिवसांत एकूण 34.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

  • पहिला दिवस - 8.75 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 12.25 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 13.75 कोटी रुपये

  • एकूण - 34.75 कोटी रुपये

'द गर्लफ्रेंड' कमाई

रश्मिका मंदाना 'द गर्लफ्रेंड' चित्रपट 7 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी 1.60 कोटी कमावले आहे. त्यामुळे 'द गर्लफ्रेंड' सिनेमाचे एकूण कलेक्शन 15.50 कोटी रुपये झाले.

'हक' कमाई

इमरान हाश्मीचा 'हक' चित्रपट 7 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी 1.20 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 16.95 कोटी झाले आहेत.

'दे दे प्यार दे 2' चित्रपट

'दे दे प्यार दे 2' चित्रपट 2019 साली रिलीज झालेल्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचा सीक्वल आहे. पहिल्या भागात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहसोबत तब्बू देखील मुख्य भूमिकेत होती. तर दुसऱ्या भागात अजय देवगण, रकुल आणि आर. माधवन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. चित्रपटात गौतमी कपूर, जावेद जाफरी, मीजान जाफरी, इशिता दत्ता आणि जानकी बोडीवाला हे कलाकार देखील झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'दे दे प्यार दे 2' नवीन वर्षात जानेवारीमध्ये ओटीटीवर पाहता येणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindu Wedding Rituals: लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी नववधू का तांदळाचं माप का ओलांडते?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ६० आमदारांविरोधात काम केलं, तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Girija Oak in Laws Family: अभिनेत्री गिरिजा ओकचे सासू-सासरे कोण? काय करतात?

Cucumber Benefits Eyes: डोळ्यांवर काकडी का ठेवतात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात, ४-५ वाहनांची जोरदार धडक

SCROLL FOR NEXT