De De Pyaar De 2 Collection saam tv
मनोरंजन बातम्या

De De Pyaar De 2 Collection : 'दे दे प्यार दे 2' ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, जगभरात किती कोटींचा गल्ला जमावला?

De De Pyaar De 2 Box Office Collection Day 4 : 'दे दे प्यार दे 2' चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. चित्रपटाने चार दिवसांत जगभरात किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'दे दे प्यार दे 2' मध्ये अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.

'दे दे प्यार दे 2' ने जगभरात 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहचा 'दे दे प्यार दे 2' चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. चित्रपटातील गाणी खूपच भन्नाट आहेत. 'दे दे प्यार दे 2' हा रोमँटिक-कॉमेडी आहे. चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहे. चार दिवसांत चित्रपटाने जगभरात 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

'दे दे प्यार दे 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाने चौथ्या दिवशी सोमवारी 4.25 कोटी रुपये कमावले आहेत. चार दिवसांत चित्रपटाने एकूण 39.00 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता चित्रपट लवकरच 50 कोटींचा टप्पा गाठणार आहे. 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाने जगभरात 54.25 कोटींची कमाई केली आहे.

  • पहिला दिवस - 8.75 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 12.25 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 13.75 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 4.25 कोटी रुपये

  • एकूण - 39.00 कोटी रुपये

'दे दे प्यार दे 2' रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'दे दे प्यार दे 2' हा रकुल प्रीत सिंहचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

  • दे दे प्यार दे - 104.13 कोटी

  • मरजावा - 48.04 कोटी

  • यारिया - 40.01 कोटी

  • दे दे प्यार दे २ - 39 कोटी

  • थँक गॉड - 36.35 कोटी

'दे दे प्यार दे 2' चित्रपट 2019 साली रिलीज झालेल्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचा सीक्वल आहे. या चित्रपटाने देखील बंपर कमाई केली. 'दे दे प्यार दे 2'मध्ये अजय देवगण, रकुल, आर. माधवन, गौतमी कपूर, जावेद जाफरी, मीजान जाफरी, इशिता दत्ता आणि जानकी बोडीवाला हे कलाकार झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT