'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ बोडके झळकला आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' (Punha Shivajiraje Bhosle ) चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत बक्कळ पैसा कमावला आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ बोडके झळकला आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 ला रिलीज झाला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. चित्रपटाची कमाई जाणून घेऊयात.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 19 लाख रुपयांची कमाई केली आहे. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी 34 लाख कमावले आहेत. दोन दिवसांत चित्रपटाने अंदाजे 53 लाख रुपयांची कमाई केली आहे. आता रविवारी चित्रपट किती कोटी कमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट रिलीज पूर्वी त्याच्या नावावरून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपट तब्बल 13 ते 14 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. 31 ऑक्टोबरला 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटासोबतच 'Well Done आई' आणि 'तू माझा किनारा' हे दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. 'Well Done आई' या चित्रपटात मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत आहे. 'तू माझा किनारा' चित्रपटात भूषण प्रधान, केतकी नारायण आणि केया इंगळे मुख्य भूमिकेत झळकले.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात त्रिशा ठोसर, भार्गव जगताप हे बालकालाकार पाहायला मिळत आहेत. तर पायल जाधव, सिद्धार्थ जाधव, पृथ्वीक प्रताप, सयाजी शिंदे, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई हे कलाकार देखील झळकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.