De De Pyaar De 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

De De Pyaar De 2 Collection : बॉक्स ऑफिसवर प्रेमाची जादू! अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे 2'नं वीकेंडला कमावले 'इतके' कोटी

De De Pyaar De 2 Box Office Collection Day 2 : 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बंपर कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. दोन दिवसांची कमाई जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'दे दे प्यार दे 2' रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे.

'दे दे प्यार दे 2' मध्ये अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.

'सन ऑफ सरदार 2'नंतर अजय देवगणचा आणखी एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जो सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाने दोन दिवसांत तुफान कमाई केली आहे. चित्रपटात अजय रकुल प्रीत सिंहसोबत झळकला आहे. 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने दोन दिवसांत किती कमावले जाणून घेऊयात.

'दे दे प्यार दे 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे 2' बंपर ओपनिंग केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशी 8.75 कोटींचा व्यवसाय केला. तर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे वीकेंडला शनिवारी छप्परफाड कमाई केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 12.25 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाने दोन दिवसांत तब्बल 21.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता चित्रपट रविवारी किती कोटी कमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'दे दे प्यार दे 2' स्टार कास्ट - कथा

'दे दे प्यार दे 2' मध्ये आर. माधवन रकुल प्रीत सिंहच्या वडिलांची भूमिका साकारत असून तो अजय देवगण आणि रकुलच्या प्रेमात अडथळे निर्माण करताना दिसत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात रकुल अजय देवगणच्या घरात जाते. यावेळी अजय देवगण रकुलच्या घरी राहायला येतो. रकुल अजयच्या वयाबद्दल पालकांना खोटे बोलते आणि हा रोमँटिक-कॉमेडी सुरू होतो. चित्रपटात गौतमी कपूर, जावेद जाफरी, मीजान जाफरी, इशिता दत्ता आणि जानकी बोडीवाला हे कलाकार देखील झळकले आहेत.

'दे दे प्यार दे' सिनेमा

'दे दे प्यार दे 2' चित्रपट 2019 साली रिलीज झालेल्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचा सीक्वल आहे. या भागात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहसोबत तब्बू देखील मुख्य भूमिकेत होती. ती अजयची बायको दाखवली होती. जिमी शेरगिल, आलोक नाथ, जावेद जाफरी, भावीन भानुशाली, मधुमालती कपूर आणि कुमुद मिश्रा हे कलाकार देखील झळकले आहेत. या चित्रपटाने देखील बंपर कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुलेखन क्षेत्रात भारताचा डंका! अक्षया ठोंबरे यांना मिळाला जागतिक स्तरावरील सर्वोच्च सन्मान

Death Signs: मृत्यूच्या २४ तासाआधी दिसणारी तीन प्रमूख लक्षणे जाणून व्हाल थक्क; तज्ज्ञांनी दिली माहिती

Maharashtra Live News Update: नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशन

Priyanka Chopra: देस गर्ल प्रियांकाचा आइवरी लेहेंग्यातील लूक व्हायरल, पाहा PHOTO

IND vs SA : मायदेशात धूळधाण, फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया; आफ्रिकेचा 30 रन्सने विजय

SCROLL FOR NEXT