
'दे दे प्यार दे' या चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग एकत्र दिसले होते. आता हे कलाकार त्याचा सिक्वेल घेऊन परतलेत. तेही हास्या खजिना घेऊन. हो नोव्हेबर महिन्यात 'दे दे प्यार दे २' प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगन आणि रकुल प्रीत सिंह यांचा प्रेमाचा खेळ खेळणार आहेत. तर आर. माधवन रकुल प्रीत सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार असून तो त्यांच्या प्रेमात अडथळे निर्माण करणार आहे. हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (De De Pyaar De 2 Trailer Out: Ajay Devgn, Rakul Preet And R Madhavan Promise A Laugh Riot)
ट्रेलर अप्रतिम असून चाहत्यांना खूप आवडला आहे. ट्रेलर पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. मागील चित्रपटात, रकुल प्रीत सिंग अजय देवगणच्या घरात जाते. यावेळी अजय देवगण रकुल प्रीत सिंहच्या कुटुंबीयांकडे राहायला येतो. अजय देवगण रकुल प्रीतच्या घरी येतो त्याला पाहून आर. माधवनला धक्का बसतो. रकुल प्रीत अजयच्या वयाबद्दल तिच्या पालकांना खोटे बोलते. आता या लढाईत कोण जिंकणार, अजय आणि रकूल एक होणार का? माधवन दोघांना दूर करण्यात यशस्वी होणार हे चित्रपट पाहिल्यानंतर कळेल, पण चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते खूश झाले आहेत.
अजय देवगण हा रकुलच्या पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर खूप गोंधळ उडतो. हा चित्रपट इमोशनल तर आहेच शिवाय यात विनोदांचा डबल डोस घेऊन आलाय. या चित्रपटात, मीजान जाफरी अजय आणि रकुलच्या प्रेमकथेत येतो. तो रकुलला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. ट्रेलरमध्ये मीजान जाफरीने अजय देवगणच्या 'फूल और कांटे' चित्रपटातील दोन बाईकचा सीन देखील रिक्रिएट केलाय. ट्रेलर हसवणारा असल्यानं चित्रपट पाहताना हसून हसून तुमचं पोट दुखल्याशिवाय राहणार नाही.
या चित्रपटात जावेद जाफरी, मीजान जाफरी, गौतमी कपूर, इशिता दत्ता, संजीव सेठ आणि जानकी वोदीवाला यांच्या भूमिका आहेत. २०२३ मध्ये पटकथा अंतिम करण्यात आली आणि मार्च २०२४ मध्ये चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.