Gautami Patil Dance Viral Video Twitter
मनोरंजन बातम्या

Gautami Patil Dance Video: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये चाहत्याचा गाडीच्या टपावर आणि साउंडवर चढत डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

Gautami Patil Dance News: गौतमीने थेट महिला प्रेक्षकांमध्ये जाऊन डान्स केला आहे, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Gautami Patil Dance Video

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. तिच्या लावणीचे फॅन्स अगदी थोरा मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेच आहेत. बीड जिल्ह्याचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या डान्सचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यानचे अनेक फोटोज आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावेळी गौतमीने थेट महिला प्रेक्षकांमध्ये जाऊन डान्स केला आहे.

गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यावर पाहणाऱ्यांची एकच गर्दी होत असते. नेहमीप्रमाणेच या कार्यक्रमालाही गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी चक्क चाहते गाडीच्या टपावर, घरावर, साउंडवर चढत डान्स करताना पहायला मिळाले. बीडच्या दौलावडगाव येथे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थक अशोक ईथापे यांनी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटीलच्या चाहत्यांनी तिचा डान्स पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

गौतमी पाटीलचा डान्स सुरू होताच कोणी घरावर चढून तर, कोणी साउंडवर चढत तुफान डान्स केला. तर एका चाहत्याने थेट स्वतःच्या गाडीच्या टपावर चढत डान्स केला. या कार्यक्रमाला पोलीसांचा फौजफाटा होता. या कार्यक्रमामध्ये महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दरम्यान गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धाराशिवमध्ये प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात; जीवितहानी नाही

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT