Bhumi Pednekar as a tough police officer in a gripping scene from the Daldal web series trailer. 
मनोरंजन बातम्या

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Daldal Trailer Out: भूमी पेडणेकर अभिनीत 'दलदल'चा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. रक्तपात, सस्पेन्सने भरलेला ट्रेलर पाहून अंगावर काटा येतो.

Bharat Jadhav

  • ‘दलदल’चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित

  • ट्रेलरमध्ये प्रचंड हिंसा आणि रक्तरंजित दृश्य

  • भूमी पेडणेकर सिरीयल किलरचा शोध घेताना दिसणार

अभिनेत्री भूमी पेडणेकर आता सिरीयल किलरचा शोध घेणार आहे. नुकतीच या सीरिजची घोषणा करण्यात आली होती आणि आता निर्मात्यांनी दलदलचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केलाय. या ट्रेलरमध्ये प्रचंड हिंसा आणि रक्तरंजित दृश्य दाखवण्यात आली आहेत. दलदलचा ट्रेलर पाहून अंगावर काटा येतो. भूमी पेडणेकरच्या या सिरीयल किलर थ्रिलर सीरिजचा ट्रेलर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

काही दिवसांपूर्वी दलदलचा टीझर समोर आला होता. त्यानंतर चाहत्यांमध्ये या सीरिजबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आता ट्रेलर रिलीज झालाय. प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर दलदलचा ट्रेलर शेअर केलाय. १ मिनिट ५२ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सस्पेन्स ठासून भरलेला आहे.

ट्रेलरमध्ये मुंबई शहरात एकामागोमाग खून होत असल्याचं दाखवण्यात आलंय. हे खून पुरुषांचे असून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्या जात असल्याचं दाखवलं गेलंय. या सगळ्या हत्यांमागे एक सिरीयल किलर असल्याचं स्पष्ट होतं. या सीरिजमध्ये भूमी पेडणेकर एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेन.

दलदलचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. भूमी पेडणेकरच्या या वेगळ्या आणि डार्क भूमिकेचीही चर्चा सुरू आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक दलदलच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही वेब सीरिज ३० जानेवारी २०२६ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीचे अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

SCROLL FOR NEXT