Daagadi Chawl 2 Movie Completes Release One Year: मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. चित्रपटात प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी, पुजा सावंत आणि मकरंद देशपांडे सह काही मराठी सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत होते. नुकताच ‘दगडी चाळ २’च्या वर्षपुर्ती निमित्त अभिनेत्री पुजा सावंतने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीला या चित्रपटानंतर ‘कलरफुल पुजा’ म्हणूनच ओळख मिळाली आहे. या ‘कलरफुल पुजा’ची सध्या सोशल मीडियावर पोस्ट तुफान चर्चेत आली आहे.
‘दगडी चाळ २’च्या वर्षपुर्ती निमित्ताने पूजा सावंतने चित्रपटाविषयी खास पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणते, “ ‘दगडी चाळ २’ वर्षपुर्ती... माझ्या या टिमबद्दल बोलावे तितके कमीच आहे. खरंतर टिम नाही... एक गोड कुटुंबच म्हणेन मी... निर्मात्या संगीता अहिर खूप सारे Thank You, सर्वांना एकत्र आणल्याबद्दल Thank You, सोबतच अंकुश चौधरी तुलाही आम्हां सर्वांना नेहमीच योग्य आणि खरा मार्ग दाखवल्याबद्दल Thank You....” (Marathi Film)
अभिनेत्री पोस्टच्या पुढच्या भागात म्हणते, माझे लाडके चंदू सर, मला ‘एक अभिनेत्री’ म्हणुन घडवल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल Thank You, आणि संजय जामखंडी सतत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्याबद्दल, मग ती ‘भेटली तु पुन्हा’ ची अश्विनी असो किंवा दगडी चाळ ची ‘कलरफुल’ खरंच मनापासून Thank You.... ‘कलरफुल’चा सिनेमातला प्रवास जरीही संपला असला तरीही तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे ‘कलरफुल’ नेहमीच तुमच्या मनात कायमची जिवंत राहील....”
पूजा सावंतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. ‘खूप खूप प्रेम पूजा सावंत’, ‘खूप सुंदर काम, कलरफुलला कधीही विसरू शकत नाही.’ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण ३.३८ कोटींची कमाई केली होती. ‘दगडी चाळ’प्रमाणे ‘दगडी चाळ २’ला सुद्धा प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्षणभर विश्रांती’च्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत डेब्यू केलं आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लपाछपी’ चित्रपटातील अभिनयासाठी तिला ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ मिळाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.