Cyrus Broacha Exits From BB OTT 2 : 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये गेल्या आठवड्यात कोणतेही एलिमिनेशन झाले नाही. होस्ट सलमान खानने 'नो इव्हिकशन'ची घोषणा केली तेव्हा सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र सायरस ब्रोचा अचानक घराबाहेर गेला.
सायरस ब्रोचा लाइव्ह फीडमध्ये कोठेही दिसला नाही. सायरस ब्रोचाला या शोमध्ये फारसे काही करता आले नाही. परंतु त्याच्या अचानक बाहेर जाणण्याची प्रेक्षकांना धक्का बसला आहे. सायरस ब्रोचाने अचानक 'बिग बॉस ओटीटी 2' का सोडला असा प्रश्न लोक विचारत आहेत.
सायरस ब्रोचाने सलमानला सांगितले होते की, त्याला झोप येत नाही आणि योग्य जेवायला मिळत नाही. तो रात्री फक्त 3 तास झोपतो आणि त्याला खूप अस्वस्थ वाटत आहे. सायरस 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाण्यासाठी विनंती करत होता.
सायरस म्हणाला की तो भावनिकदृष्ट्या खचून गेला आहे आणि शोमध्ये काहीही योगदान देऊ शकत नाही. जेव्हा सायरसने सांगितले की आपण शारीरिकदृष्ट्या थकलो आहोत आणि सलमान काय बोलतो ते त्याला काही वेळानंतर कळत नाही हे सांगताच सर्वांनाच धक्का बसला. आता सायरस अचानक शोमधून गायब झाला आहे.
सायरस ब्रोचाने एक्झिट घेण्यामागे अनेक कारणे दिली होती, पण सलमान आणि पूजा भट्ट यांनी मिळून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सायरस शोमध्ये थांबेल असे सर्वांना वाटत होते. पण आता सायरसच्या टीमकडूनही उत्तर आले आहे. सायरस ब्रोचा 'बिग बॉस OTT 2' मधून बाहेर पडण्याचे कारण समोर आले आहे. (Latest Entertainment News)
सायरस ब्रोचाच्या टीमने सांगितले की, कुटुंबातील आपत्कालीन परिस्थितीमुळे त्याला 'बिग बॉस ओटीटी 2'मधून अचानक बाहेर पडावे लागले. सायरस आणि त्याच्या कुटुंबीयांनी विनंती केली आहे की या कठीण काळात त्यांना प्रायव्हसी द्यावी आणि परिस्थिती समजून घ्यावी. आता सायरस ब्रोचा शोमध्ये परतणार की नाही याबाबत काहीही सांगणे कठीण आहे.
या आठवड्यातील नॉमिनेटेड स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर सायरसला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. तर जिया शंकर कॅप्टन असल्याने सुरक्षित आहे. अविनाश सचदेवला प्रेक्षकनाच्या मतांनी वाचवले आहे. या व्यतिरिक्त, या आठवड्यात 'बिग बॉस ओटीटी 2' मधून बाहेर जाण्यासाठी सर्व सदस्य नॉमिनेटेड आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.