Yuzvendra Chahal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yuzvendra Chahal: मला फक्त एक मॅसेज...; चहलने सांगितलं घटस्फोट घेताना का घातला 'बी युअर ओन शुगर डॅडी' टी-शर्ट

Yuzvendra Chahal: धनश्री वर्मासोबत घटस्फोटादरम्यान, युजवेंद्र त्याच्या एका टी-शर्टमुळे खूप चर्चेत होता. त्याच्या त्या टी-शर्टवर लिहिले होते 'बी युअर ओन शुगर डॅडी' असा टी-शर्ट का घातला याचा खुलासा चहलने केला आहे.

Shruti Vilas Kadam

Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर, त्याचे नाव आता आरजे महवशसोबत जोडले जात आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले एवढचं नाही तर अलिकडेच ते लंडनमध्ये एकत्र वेळ घालवतानाही दिसले. धनश्री वर्मासोबत घटस्फोटादरम्यान, युजवेंद्र त्याच्या एका टी-शर्टमुळे चर्चेत होता. त्याच्या टी-शर्टवर 'बी युअर ओन शुगर डॅडी' लिहिले होते. आता स्वतः क्रिकेटपटूने घटस्फोटादरम्यान हा टी-शर्ट घालण्याचे कारण सांगितले आहे.

'बी युअर ओन शुगर डॅडी' टी-शर्ट घालण्याचे कारण

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल अलीकडेच राज शमनीच्या पॉडकास्टवर दिसला. या दरम्यान, त्याने त्याचा व्हायरल "बी युअर ओन शुगर डॅडी" टी-शर्ट घालण्यामागील कारण सांगितले आहे. जो त्याने धनश्री वर्मासोबत घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान घालताना दिसला होता. चहल म्हणाला, 'मला फक्त एक संदेश द्यायचा होता आणि मी तो दिला.' तो पुढे म्हणाला, 'कारण मला आधी असं वाटत नव्हतं पण माझ्यासमोर काहीतरी घडलं, मग मी असं म्हटलं, आता मला कोणाचीही पर्वा नाही.' म्हणून मी तो टी-शर्ट घातला.'

मी कोणालाही दुखावण्यासाठी केले नाही

युजवेंद्र चहल पुढे म्हणाला, की त्याने जे काही केले ते त्याने रागाच्या भरात किंवा कोणालाही दुखावण्यासाठी केले नाही. तो म्हणाला, 'मी कोणाशीही गैरवर्तन केले नाही किंवा काहीही केले नाही.' चहल आणि धनश्रीचा घटस्फोट चर्चेत होता.

धनश्री आणि युजवेंद्रचा २०२० मध्ये लग्न झालं

चहल आणि धनश्रीचा २०२० मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघांच्या लग्नाला अनेक चित्रपट स्टार आणि क्रिकेटपटू उपस्थित होते. पण त्यांच्या लग्नाच्या एका वर्षानंतर मतभेद निर्माण होऊ लागले, ज्यामुळे ते एक वर्ष वेगळे राहत होते. त्यानंतर अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Thursday Horoscope: अहंकारामुळे वाद होण्याची शक्यता, ४ राशींनी टाळा प्रवास; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT