Smriti Mandhana SAAM TV
मनोरंजन बातम्या

Smriti Mandhana : पलाशने दिलेली साखरपुड्याची अंगठी स्मृतीच्या बोटातून गायब, 'तो' VIDEO होतोय व्हायरल

Smriti Mandhana Video : लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृती मानधनाने पहिलीच पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टमध्ये नेमकं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.

लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृती मानधनाची पहिली पोस्ट

पलाश मुच्छलने दिलेली साखरपुड्याची अंगठी स्मृती मानधनाच्या हातात दिसत नाही.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल 23 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार होते. मात्र स्मृती मानधनाच्या वडीलांना हार्ट अटॅक आल्यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले. स्मृती आणि पलाश तब्बल 6 वर्ष एकमेकांना डेट करत होते.

स्मृतीच्या वडीलांना तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर काही वेळाने पलाशची तब्येत देखील बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांनी पलाश मुच्छल स्मृती मानधनाला धोका देत असल्याचे बोले गेले. अमिता मुच्छल यांनी सांगितल्यानुसार, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बरी होत नाही, तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय हा पलाशने घेतला. पलाशचे स्मृतीच्या वडीलांशी चांगले नाते आहे.

लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पहिलीच पोस्ट केली आहे. ही एक पोस्ट म्हणजे टूथपेस्ट ब्रँडचा प्रमोशनल व्हिडीओ आहे. मात्र तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्मृतीच्या या व्हिडीओमध्ये तिच्या हाताच्या बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी दिसत नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्मृती आणि पलाशच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

स्मृतीच्या बोटात साखरपुड्याची अंगठी नसल्याचे पाहून काही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र काही चाहते हा व्हिडीओ लग्नाच्या आधी शूट केल्याचे तसेच पलाश मुच्छलनं स्मृती मानधनाला प्रपोज करण्यापूर्वीचा असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे स्मृती मानधनाच्या हातात पलाश मुच्छलने दिलेली अंगठी दिसत नाही आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कधीचा हे अधिकृतरित्या अद्याप स्पष्ट झाले नाही.

स्मृती मानधनाच्या या पोस्टवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहे. तसेच पुन्हा एकदा स्मृती मानधनाला पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. स्मृती मानधना व्हिडीओत आपल्या क्रिकेट प्रवासाविषयी बोलताना दिसत आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा आनंद, त्याच्यासाठी घेतलेली मेहनत याविषयी ती बोलत आहे. स्मृती मानधना "हाय मी स्मृती मानधना, भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार..." असे म्हणून व्हिडीओला सुरूवात करते. चाहते आता स्मृती मानधनाला पुन्हा खेळताना पाहायला उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार; वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT