Shardul Thakur Instagram @shardul_thakur
मनोरंजन बातम्या

Shardul Thakur: शार्दूल ठाकूर अडकणार लग्नबंधनात, मुंबई जवळील 'या' ठिकाणी संपन्न होणार विवाह सोहळा

शार्दूल ठाकूरचा मित्ताली पारूलकरशी गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता.

Pooja Dange

Shardul Thakur Wedding Update: भारतीय क्रिकेटर शार्दूल ठाकूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शार्दूल ठाकूरचा मित्ताली पारूलकरशी गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता. पुढच्या वर्षी २७ फेब्रुवारीला शार्दूल आणि मित्ताली लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची माहिती खुद्द मितालीने दिली आहे.

शार्दूल ठाकूरची होणारी पत्नी मित्तालीने त्यांच्या लग्नाविषयी माहिती देत म्हटले आहे की, मी आमच्या लग्नाबाबत खूप उत्साहित आहे. आमच्या लग्न समारंभाची सुरूवात २५ फेब्रुवारीपासून होणार आहे. त्यांचा (शार्दुलचा) शेड्युल व्यस्त आहे आणि ते २४ फेब्रुवारीपर्यंत सामने खेळणार आहेत. म्हणून २५ फेब्रुवारीलाच सगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मी लग्नाची सर्व जबाबदारी घेतली आहे. आम्ही लग्नात जवळजवळ २००-२५० पाहुणे येतील अशी अपेक्षा करत आहोत. (Celebrity)

आमचे लग्न मुंबई जवळील कर्जत येथे होणार आहे. आधी आम्ही गोव्याला डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा विचार करत होतो. परंतु लॉजिस्टिक आणि इतके पाहुणे यामुळे हे कठीण वाटते. सध्या मी डिझाइनर फायनल करत आहे. मला माहित आहे की मी मुख्य कार्यक्रमाच्या वेळी नऊवारी नसणार आहे हे नक्की, बाकीच्या कार्यक्रमाला काय घालायचे याचा आम्ही अजून विचार करत आहोत. अजून आम्ही फायनल लूक ठरवलेला नाही." (Wedding)

मित्तालीने हे स्पष्ट केले आहे के त्यांचे लग्न महाराष्ट्रीय परंपरेनुसार पार पडणार आहे. त्यांच्या वेडिंग केक सुद्धा ती स्वतः बनणार आहे. बॉलिवूड कलाकारांनंतर आता भारतीय क्रिकेटर सुद्धा लग्नबंधनात अडकणार आहेत. केएल राहुलनंतर आता शार्दूल ठाकूरच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निकाल पुढे ढकलला, EVM मध्ये मतं सुरक्षित राहतील का? संगणक शास्त्रज्ञांनी थेट डेमो दाखवला

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Winter Fashion: हिवाळ्यात स्टायलिश लूकसाठी या टिप्स नक्की फॉलो करा, मिळेल ट्रेंडी आणि ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update: निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल

Olya Naralache Vade: जेवणाला पुऱ्याच कशाला? बनवा पांरपांरिक पद्धतीने कुरकुरीत ओल्या नारळाचे वडे

SCROLL FOR NEXT