Cobra Irfan Pathan Cobra Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

Cobra Trailer: क्रिकेटपटू इरफान पठाणची सिनेसृष्टीत एन्ट्री; 'कोब्रा' सिनेमाचं ट्रेलर लॉन्च

Cobra Irfan Pathan Cobra Movie : इरफान पठाणने टॉलीवूडमध्ये आपला प्रवास सुरू केला आहे. 'कोब्रा' या तमिळ चित्रपटातून इरफान पठाण सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजीने क्रिकेटच्या रंगमंचावर धूमाकुळ घालणारा माजी भारतीय क्रिकेटपटू (Cricketer) इरफान पठाण आता चित्रपट विश्वात पाऊल ठेवत आहे. इरफान पठाणने टॉलीवूडमध्ये आपला प्रवास सुरू केला आहे. 'कोब्रा' (Cobra) या तमिळ चित्रपटातून इरफान पठाण सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकताच सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये इरफान मुख्य भूमिकेत दिसत आहे. (Cobra - Irfan Pathan Upcoming Movie)

हे देखील पाहा -

२०२० मध्ये वाढदिवसानिमित्त इरफान पठाणने चित्रपटात (Movie) काम करण्याबाबत माहिती देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होते. आता चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे ज्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या दमदार भूमिकेत इरफान पठाण दिसतो आहे. सुरेश रैनाने हा चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत चित्रपटाविषयीची उत्सुकता व्यक्त केली आहे.

इरफान पठाणचा मित्र सुरेश रैनाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर 'कोब्रा' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने, "तुला 'कोब्रा' या चित्रपटात अभिनय करताना पाहून खूप आंनद झाला. चित्रपटात अॅक्शन आहे. तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला शुभेच्छा! चित्रपट पाहण्यासाठी आता प्रतिक्षा करू शकत नाही" असा कॅप्शन दिला आहे.

अजय ग्यानमुथु दिग्दर्शित 'कोब्रा' चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील संगीत प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले आहे. चित्रपटात इरफानसोबत तमिळ अभिनेता चियान विक्रम मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात चियान सातहून अधिक भूमिका साकारणार आहे. आऊट ऑफ द बॉक्स चित्रपट बनवणाऱ्या चियान विक्रमला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. चित्रपट तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

Edited By - Manasvi Chaudhari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanush: 'रांझणा'चा क्लायमॅक्स एआयने बदलल्यामुळे सुपरस्टार धनुषने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, हा तो चित्रपट...

Maharashtra Live News Update : एक मंडळ एक ढोल पथक करा, गणेश मंडळांची पोलिसांना विनंती

Dadar Kabutar Khana: दादरमध्ये कबुतर खाना कुठे आहे?

Nashik Crime : दारु पिण्यास मागितले पैसे; कुटुंबीयांनी नकार दिल्याने राग अनावर, पेट्रोल टाकून राहते घरच पेटविले

Pune Accident: रक्षाबंधनाआधीच बहीण-भावाची ताटातूट, अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू, बहिणीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT