Virat-Anushka Kirtan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Virat- Anushka Kirtan Video: विराट- अनुष्का कृष्णा दास यांच्या कीर्तनात दंग; व्हिडिओ तुफान व्हायरल

Virat- Anushka Viral Video: क्रिकेट संघाचा वेगवान फलंदाज विराट कोहली आणि पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लंडनमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहेत.

Chetan Bodke

Virat- Anushka Kirtan Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लंडनमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर टीम इंडिया सध्या मोठ्या ब्रेकवर आहे. सध्या काही भारतीय खेळाडू परदेश दौऱ्यासाठी बाहेर आहेत. परदेशात आपल्या सुट्टीचा आनंद विराट कोहली आणि अनुष्का शर्मा देखील लुटत आहेत.

लंडनमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद लुटत असताना, विराट आणि अनुष्का देखील कृष्णा दास यांच्या किर्तनामध्ये तल्लीन होताना दिसले. यावेळी दोघांनीही मिळून कीर्तनाचा मनमुराद आनंद लुटला. विराट आणि अनुष्काचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, किर्तनात तल्लीन झालेल्या क्यूट कपल पाहून नेटकऱ्यांनी व्हिडीओला तुफान व्हायरल केलं आहे. नेमके कृष्ण दास कोण आहे? कोहली आणि अनुष्का कोणाच्या कीर्तनात पोहोचले, जाणून घेऊया...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोहली आणि अनुष्का प्रेक्षकांमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी त्या दोघांनीही प्रेक्षकांमध्ये बसून किर्तनाचा आनंद लुटला. कृष्णा दास यांच्या बद्दल बोलायचे तर, ते मुळचे अमेरिकन गायक. भक्तीगीते गाण्यासाठी त्यांची विशेष ओळख आहे. गेल्या ४० वर्षांपासून कृष्णा दास हे कीर्तन करत असून त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराट आणि अनुष्का याआधी अनेकवेळा धार्मिक स्थळांवर स्पॉट झाले आहेत. या दोघांनी यापूर्वी भारतातील उज्जैन येथील महाकालाचे दर्शन घेतले होते, त्यानंतर ते वृंदावनलाही गेले होते.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी मिळू शकते, अशी सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्या युवा खेळाडूंमध्ये यशस्वी जयवाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा देखील समावेश आहे. BCCI यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या काही खेळाडूंना विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती देण्याची शक्यता आहे. गेल्या काही वेळापासून हे खेळाडू सातत्याने खेळत असून या खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती दिली जाऊ शकते.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना १२ जुलैपासून विंडसर पार्क येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. विंडीज दौऱ्यानंतर भारताला आशिया चषक स्पर्धेसाठी देखील तयारी करायची आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारताने शेवटच्या वेळी पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताच्या विजयात कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT