Shoaib Akhtar Twitter/ @shoaib100mph
मनोरंजन बातम्या

Shoaib Akhtar Biopic Rawalpindi Express: 'या' प्रसिद्ध खेळाडूचा बायोपिक बनणार नाही, खेळाडूनेच स्पष्ट केलं 'हे' कारण...

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या बायोपिक 'रावळपिंडी एक्स्प्रेस रनिंग अगेन्स्ट द ऑड्स'मधून माघार घेतली आहे. त्याने याबाबत ट्विट करत माहिती दिली.

Chetan Bodke

Shoaib Akhtar Biopic Rawalpindi Express: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या बायोपिक 'रावळपिंडी एक्स्प्रेस रनिंग अगेन्स्ट द ऑड्स'मधून माघार घेतली आहे. त्याने याबाबत ट्विट करत माहिती दिली.

अख्तरने सांगितले की, मी सांगू इच्छितो, काही महिने विचार केल्यानंतर मी माझा बायोपिक 'रावळपिंडी एक्सप्रेस'पासून वेगळा झालो आहे. बायोपिकबाबत मी चित्रपट निर्मात्यांशी केलेला करार पूर्णपणे रद्द केला आहे. यानंतर जर कोणी माझ्या नावाचा वापर करून चित्रपट बनवला तर मी त्याच्यावर गुन्हा दाखल करेन.

शोएब अख्तरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'माझ्या चाहत्यांना दु:खाने सांगू इच्छितो की, अनेक महिन्यांच्या विचारानंतर मी 'रावळपिंडी एक्सप्रेस' चित्रपट निर्मात्यांसोबत माझा करार रद्द केला आहे. या चित्रपटातून स्वतःला वेगळे करण्याचा मी निर्णय घेतला आहे. अर्थात, हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता आणि मी त्यावर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने गोष्टी व्यवस्थित होत नव्हत्या. चित्रपट अयशस्वी झाल्यामुळे आणि कराराच्या अटींचे सतत उल्लंघन केल्यामुळे मी या चित्रपटातून माघार घेतली.

अख्तर पुढे म्हणाले, 'म्हणूनच मी माझ्या बायोपिकचे राईट्स रद्द करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रोटोकॉलचे पालन करून या प्रकल्पातून बाहेर पडलो आहे. करार रद्द केल्यानंतरही निर्मात्यांनी माझा बायोपिक बनवत राहिल्यास आणि माझ्या नावाचा वापर केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.' असे शोएबने सांगितले.

गेल्या वर्षी शोएबने मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते. मोहम्मद फराज कैसर शोएबचा बायोपिक 'रावळपिंडी एक्सप्रेस' दिग्दर्शित करत होते आणि क्यू फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाचे लेखन कैसर नवाज यांनी केले होते. अख्तरने गेल्या वर्षी जुलैमध्ये या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'चड्डी बनियन गँग' ते शिरसाटांचा बेडरुम व्हिडिओ; विधान भवनात अनिल परब यांचा हल्लाबोल, VIDEO

Wakad Tourism: पुण्याजवळ फिरायचंय? मग एका दिवसात वाकडची ट्रिप नक्की प्लान करा

Famous Actress Death : कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली; प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, मनोरंजन सृष्टीत शोककळा

Maharashtra Live News Update: बच्चू कडूंच्या रॅलीमुळे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Rutuja Deshmukh: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्या अन् नंदिनीची सासू कोण?

SCROLL FOR NEXT