Ricky Kej Won Grammy Awards 2023  twitter @rickykej
मनोरंजन बातम्या

Grammy Awards 2023: रिकी केजने तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार

रिकी केजच्या या अल्बमला सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम श्रेणीत नामांकन मिळाले होते.

Saam Tv

Composer Ricky Kej Won Grammy Award: ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 चे भारतात आज म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी थेट प्रक्षेपण केले जात आहे. यावेळी ग्रॅमी अवॉर्डमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. या अवॉर्ड शोमध्ये काही नवीन पुरस्कारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गीतकार, व्हिडिओ गेम्ससाठी सर्वोत्कृष्ट स्कोअर साउंडट्रॅक आणि इतर अनेक श्रेणींचा ग्रॅमी अवॉर्ड्स २०२३ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या रिकी केजने ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. डिव्हाईन टाइड्स या अल्बमसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रिकी केजच्या या अल्बमला सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम श्रेणीत नामांकन मिळाले होते. ब्रिटीश रॉक बँड 'द पोलिस'चे ड्रमर स्टुअर्ट कोपलँड यांच्यासोबत त्यांनी त्यांचा पुरस्कार शेअर केला.

क्रिस्टीना जेन इराब्लूम (चित्रित द इनव्हिजिबल – फोकस 1), अगुइलेरा (अगुइलेरा), द चेनस्मोकर्स (मेमरीज… डू नॉट ओपन), आणि निडारोसडोमेन्स जेंटकोर आणि ट्रॉन्डहेमसोलस्टीन (तुवाह्यून – बीटिट्यूड्स फॉर अ वूंडेड वर्ल्ड) या श्रेणीतील इतर नामांकित स्पर्धक आहेत.

हा आनंद सर्वांसोबत शेअर करत रिकी केजने त्याच्या ट्विटरवर काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. ज्यामध्ये त्याच्या हातात पुरस्कार दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत रिकीने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी नुकताच तिसरा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे. मी खूप कृतज्ञ आहे, अवाक आहे! हा पुरस्कार मी भारताला समर्पित करतो.

भारतीय संगीतकार रिकी केज याने सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम श्रेणीमध्ये त्याचा दुसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. रॉक लिजेंड स्टीवर्ट कोपलँडसह त्याने या अल्बमसाठी पुरस्कार देखील जिंकला. 2015 मध्ये, त्याने विंड्स ऑफ संसारसाठी पहिला ग्रॅमी जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल 10 मिनिटे विलंबाने सुरु

Calcium Deficiency: कॅल्शियमची कमतरता असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणं

Chinch Gulachi Amti Recipe: आंबट- गोड चिंच, गुळाची आमटी कशी बनवण्याची? सोपी रेसिपी जाणून घ्या

Shanaya Kapoor: शिमर ड्रेसमध्ये शनाया कपूरचा सिझलिंग लूक व्हायरल, पाहा PHOTO

Army Jeep Accident: लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; वळणावरून जाताना जीप उलटली, मेजरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT