मनोरंजन बातम्या

Tirthanand Rao News : प्रसिद्ध कॉमेडियनचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबूक लाईव्हमध्ये सविस्तर कारण देत उचललं टोकाचं पाऊल

Tirthanand Rao News : एक महिला आपल्याला ब्लॅकमेल करत आहेत. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तीर्थानंदने म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध कॉमेडियनने फेसबूक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. कॉमेडियन तीर्थानंद राव याने सोशल मीडियावर लाईव्ह येत आत्महत्येचा प्रयत्न केला.

तीर्थानंदने आपल्या फेसबूकमध्ये आपण हे टोकाचं पाऊल का उचलत आहोत याची देखील माहिती दिली आहे. एक महिला आपल्याला ब्लॅकमेल करत आहेत. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तीर्थानंदने म्हटलं आहे.

फेसबुकवर लाईव्हमध्ये तीर्थानंदने सांगितलं की, तो एका महिलेसोबत 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र ही मला आता ब्लॅकमेल करत आहे आणि पैशांची देखील मागणी करत आहे. या महिलेमुळे मी 3-4 लाख रुपयांच्या कर्जात बुडालो आहे.

मी या महिलेला ऑक्टोबर 2022पासून ओळखतो. महिलेने माझ्याविरुद्ध भाईंदरमध्ये पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. मात्र तक्रार कशासाठी दाखल केली हे देखील मला कळले नाही. त्यानंतरही ती मला फोन करायची आणि भेटायला बोलवायची, असं तीर्थानंदने फेसबूक लाईव्हमध्ये सांगितलं. (Latest News Update)

फिनाईल प्यायलं

लाईव्ह सेशन सुरु असतानाच तीर्थानंदने फिनाईलची बाटली काढली आणि त्यातील फिनाईल प्यायलं. तीर्थानंदचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचे मित्र तातडीने त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी तीर्थानंतर बेशुद्ध अवस्थेत आढळला. मित्रांनी पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला जवळील रुग्णालयात दाखल केलं. सध्या तीर्थानंदची तब्येत स्थीर आहे.  (Latest Entertainment News)

कोण आहेत तीर्थानंद?

तीर्थानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील नामवंत कॉमेडियन आहे. त्याने द कपिल शर्मा शोमध्येही काम केलं आहे. ज्युनियर नाना पाटेकर म्हणूनही त्याला ओळखलं जातं. कॉमेडी सर्कस के अजुबे या शोमध्येही त्याने कपिल शर्मासोबत काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservsation : तहसीलदारांचं टेन्शन वाढलं ? अवैध कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कारवाई होणार|पाहा VIDEO

Dhanashree Verma On Pawan Singh: धनश्री वर्मासोबत फ्लर्ट, पवन सिंहवर आणखी एक गंभीर आरोप; अभिनेत्री रागारागात म्हणाली...

Maharashtra Live News Update: राज्यात उद्रेक निर्माण होतोय, त्यावर बोला - छगन भुजबळ

Axe Attack : भयानक! पत्नी अन् मुलासमोरच कुऱ्हाडीनं शीर केलं धडावेगळं, अमेरिकेत भारतीय व्यक्तीची निर्घृण हत्या

India-Pakistan Match: 'माझा देश माझं कुंकू' मोहीम;भारत-पाक सामन्यावरुन ठाकरे आक्रमक

SCROLL FOR NEXT