Kapil Sharma And Sunil Grover Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunil Grover 'गुत्थी' बनून पुन्हा हसवण्यासाठी सज्ज; 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'चा ट्रेलर आऊट

The Great Indian Kapil Sharma Show Trailer: 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हरसोबत अर्चना पूरण सिंह, किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यासह इतर अनेक स्टार्सही या शोमध्ये दिसणार आहेत.

Priya More

The Great Indian Kapil Sharma Show:

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण यावेळी कपिलच्या शोचे नाव आणि ते प्रसारित होण्याचे ठिकाण मात्र वेगळं असणार आहे. कपिल शर्माच्या नवीन कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'चा (The GReat Indian Kapil Sharma Show) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. कपिलचा हा शो नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या शोमध्ये कपिल शर्मासोबत कॉमेडियन सुनील ग्रोव्हरही त्याच्या लोकप्रिय गुत्थी पात्रासह एन्ट्री करणार आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हरसोबत अर्चना पूरण सिंह, किकू शारदा आणि कृष्णा भिषेक यांच्यासह इतर अनेक स्टार्सही या शोमध्ये दिसणार आहेत. या शोच्या ट्रेलरची सुरुवात कपिलने गिफ्ट बॉक्स अनबॉक्स केल्यापासून होते. ज्यातून सुनील त्याच्या गुत्थी अवतारात पाहायला मिळत आहे. कपिल शर्मा या शोच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

ट्रेलरमध्ये बॉलिवूडचे कपूर कुटुंब म्हणजेच रणबीर कपूर, रिद्धिमा आणि नीतू कपूर, चित्रपट निर्माता इम्तियाज अली, अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा, अभिनेता आमिर खान, भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि बॅट्समन श्रेयस अय्यर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची या शोमध्ये ग्रँड एन्ट्री होते. कपिल शो होस्ट करताना म्हणतो, 'आम्ही परत आलो आहोत! भारतातील आमच्या सर्व चाहत्यांसाठी, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि जगभरातील आमच्या चाहत्यांसाठी, विशेषत: कोरिया आणि मंगोलियातील, ज्यांना आमची आठवण येत आहे. आम्ही 30 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर येत आहोत!'

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात 2017 मध्ये मोठे मतभेद झाले होते. त्यांच्यामधील वाद चांगलाच चर्चेत आला होता. दोघे फ्लाइटमध्ये एकत्र प्रवास करत होते तेव्हा त्यांच्यात वाद झाला होता. गँगसोबत पुन्हा एकत्र येण्याचा आनंद व्यक्त करताना सुनील ग्रोव्हर म्हणाला, 'द ग्रेट इंडियन कपिल शो घरवापसीसारखे वाटत आहे. जिथून निघालो तिथून सुरुवात केली. आमचे चाहते एका कुटुंबासारखे आहेत आणि यावेळी आम्ही नेटफ्लिक्समुळे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

SCROLL FOR NEXT