Comedian Raju Srivastav Passed Away SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava : हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचं निधन

वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Comedian Raju Srivastav Passed Away : मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हास्यकलाकार राजू श्रीवास्तव (Raju Srivastava Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील (Delhi) एम्स रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. 42 दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले.

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या राजू श्रीवास्तव याला प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना वाचवू शकले नाहीत आणि सर्वांना रडवून सर्वांना हसवणाऱ्या राजू यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

मैंने प्यार किया या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. तसेच 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT