Hastay Na Hasayla Pahije Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

निलेश साबळे-भाऊ कदमसह ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज, 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' २० एप्रिलपासून भेटीला

Priya More

Hastay Na Hasayla Pahije Show:

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या आवडता शो 'चला हवा येऊ द्या'ने (Chala Hawa Yevu Dya Show) काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारे निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचे चाहते हा शो संपल्यामुळे नाराज झाले होते. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम तुम्हाला हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. त्यांचा नवा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या दोघांना विनोदवीर ओंकार भोजने देखील साथ देणार आहे.

महाराष्ट्राचा लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॅा. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठी घेऊन येते आहे. निलेश साबळेबरोबर भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी असणार आहे. निलेश साबळेच्या या आगामी शोचे नाव 'हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!' असे आहे. या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. या शोमध्ये निलेश साबळेसोबत भाऊ कदम, ओंकार भोजने, सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार सर्वांना हसवणार आहेत.

'हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!' या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅामेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार प्रत्येक भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देणार आहेत. त्यामुळे विनोदाचा हा पॅावरबाज डोस घेण्यासाठी सर्वांनी सज्ज राहा.

निलेश साबळेने आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात निलेश साबळेचे चाहते आहेत. तर भाऊ कदमने आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार - रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT