comedian and poet Dr Mirza Rafi Ahmed Baig  Saam tv
मनोरंजन बातम्या

Poet Death: महाराष्ट्राचा तेजस्वी तारा निखळला! सुप्रसिद्ध कवी यांचे निधन, मराठी साहित्यविश्वात शोककळा

Poet Death: सुप्रसिद्ध हास्यसम्राट व लोककवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे 68व्या वर्षी निधन झाले. ६ हजारांवर काव्यमैफिली, २० काव्यसंग्रह आणि वऱ्हाडी भाषेला राष्ट्रीय ओळख देणारे साहित्यिकाच्या निधनाने साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Poet Death: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, वऱ्हाडी भाषेचे अभिमान आणि हास्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज पहाटे 6.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 68व्या वर्षी ‘मिर्झा एक्सप्रेस’ म्हणून गाजलेल्या त्यांच्या काव्यमय प्रवासाला आज विराम मिळाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन कन्या असा परिवार आहे. डॉ. मिर्झा यांच्यावर आज दुपारी दोननंतर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार होतील.

डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे नाव घेताच हास्यरस, वऱ्हाडी बोलीची खुमासदार शैली आणि लोकाभिमुख कविता यांची आठवण जागी होते. गेले पाच दशके त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील कवी संमेलनांना एका वेगळ्या उंचीवर नेले. जवळपास ५० वर्षे ते साहित्यिक मंचांचे आकर्षण केंद्र राहिले. त्यांची वाणी, विनोदबुद्धी आणि सहजसोपी मांडणी यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होत. काव्य, विनोद आणि सामाजिक जाण यांचा सुंदर संगम असलेल्या त्यांच्या शैलीने हजारो रसिकांचे मनोरंजन केले.

त्यांनी सादर केलेल्या ६ हजारांहून अधिक काव्यमैफिली हेच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि बहुआयामी प्रतिभेचे प्रतिक आहे. महाराष्ट्रभर तसेच देशभरात त्यांनी वऱ्हाडी भाषेला मोठी ओळख मिळवून दिली. त्यांच्या कविता साध्या, सरळ पण हृदयाला भिडणाऱ्या आहेत म्हणूनच त्यांना ‘लोककवी’ अशी मानाची उपाधी लाभली होती.

डॉ. मिर्झा यांचे साहित्यक्षेत्रातही मोठे काम केले आहे. त्यांचे २० काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून ‘मिर्झाजी कहिन’ हा त्यांचा स्तंभ अत्यंत लोकप्रिय ठरला. या स्तंभातून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर विनोदी पण नेमक्या भाषेत भाष्य केले. त्यांच्या लिखाणातील शब्दकळा, वळणदार विनोद आणि मानवी भावनांचे अचूक चित्रण ही त्यांची विशेष जमेची बाजू होती.

त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील काव्यविश्व, सांस्कृतिक जगत आणि विशेषतः वऱ्हाडी भाषिकांसाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हास्य, कविता आणि लोकभावनांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मागे ठेवलेली अमूल्य परंपरा सदैव स्मरणात राहील. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना काव्यविश्वाचा एका युगाचा मानकरी म्हणून कायम आदरांजली दिली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT