Sunil Grover  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sunil Grover : प्रेक्षकांना हसवणाऱ्या कॉमेडियनच्या डोळ्यात पाणी; रस्त्यावर विकतोय कांदे, नेमकं कारण काय?

Sunil Grover Post : अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोवर रस्त्यावर कांदे विकत आहे. त्याने सोशल मीडियावर कांदे विकतानाचे फोटो शेअर केले आहेत. नेमकं यामागचे कारण जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोवरचे (Sunil Grover) काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये सुनील ग्रोवर चक्क कांदे विकताना पाहयला मिळत आहे. त्याने सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो रस्त्याच्या कडेला कांदे विकताना दिसत आहे. सुनील ग्रोवरवर ही वेळ का आली, तो कांदे का विकतोय हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

सुनील ग्रोवरच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या पोस्टला सुनीलने हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "आज कांद्याचे काहीतरी बनवा. आनंदाचा काळ जाऊ द्या." पहिल्या फोटोमध्ये सुनील ग्रोवर कांद्याने भरलेल्या ट्रकमध्ये बसला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तो कांद्याचे तराजूत वजन करत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये तो एका महिलेला कांदे विकत आहे. तसेच एका छोट्या मुलाला मांडीवर घेऊन बसला आहे.

कमेंट्समध्ये नेटकरी कांद्यांचे भाव विचारत आहे. तर आपल्या मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. सुनील ग्रोवर हा विनोदी कलाकार आणि अभिनेता आहे. आपल्या विनोदाने तो कायम प्रेक्षकांना हसवतो. सध्या सुनील ग्रोवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये काम करत आहे.

सुनीलची 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' मधील 'गुत्थी' ही भूमिका खूप हटके होती. तिला खूपच लोकप्रियता मिळाली. त्याने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याची 'द कपिल शर्मा शो'मधील 'डॉ. मशहूर गुलाटी' भूमिकेने प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT