Suniel Shetty: सुनील शेट्टीचं ३ वर्षांनंतर पुनरागमन; 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' साकारणार योद्धाची भूमिका

Kesari veer legends of somnath: 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून ३ वर्षांनंतर सुनील शेट्टी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
Kesari veer legends of somnath
Kesari veer legends of somnathSaam tv
Published On

Kesari veer legends of somnath: सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सूरज पंचोली स्टारर 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' चा टीझर रिलीज झाला आहे, जो दमदार अॅक्शन आणि हाय-ऑक्टेन सीक्वेन्सने भरलेला आहे. हे ऐतिहासिक नाटक १४ व्या शतकात प्रसिद्ध सोमनाथ मंदिराचे आक्रमणकर्त्यांपासून रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर योद्ध्यांच्या कहाणीवर आधारित आहे.

सुनील शेट्टीचे जोरदार पुनरागमन

टीझरमध्ये अनेक रोमांचक क्षण पाहता येतील, परंतु सर्वात खास गोष्ट म्हणजे सुनील शेट्टी तीन वर्षांनी 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर जोरदार पुनरागमन करत आहेत. तो शेवटचा २०२२ मध्ये आलेल्या 'घानी' चित्रपटात दिसला होता आणि आता तो त्याच्या चाहत्यांना एका ऐतिहासिक थ्रिलर आणि साहसी प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे.

Kesari veer legends of somnath
Ranveer Allahbadia: 'त्याच्या मनात घाण...; कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झापले, भारताबाहेर जाण्यास बंदी, SC मध्ये काय झालं?

चित्रपटात वेगडाची भूमिका करणारा सुनील शेट्टी टीझरमध्ये एका दमदार अॅक्शन सीनमध्ये दिसत आहे. सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी लढलेल्या ऐतिहासिक लढाईत त्याचे पात्र महत्त्वाची भूमिका बजावते. सुनील शेट्टीने त्याच्या दशकांच्या कारकिर्दीत एक परिपूर्ण कलाकार म्हणून सातत्याने स्वतःला विकसित केले आहे आणि 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' मधील त्याची भूमिका पुन्हा एकदा त्याची बहुमुखी प्रतिभा प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी आणि सूरज पंचोली मुख्य भूमिकेत आहेत, तर विवेक ओबेरॉय जफर नावाच्या खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Kesari veer legends of somnath
Chhaava Movie Collection: 'छावा' समोर 'पुष्पा २' ची जादू फेल; सोमवारी इतकी कमाई करुन केला नवा रेकॉर्ड

या पीरियड ड्रामामधून आकांक्षा शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ती सूरज पांचोलीसोबत एक रोमँटिक भूमिका साकारत आहे. प्रिन्स धीमान दिग्दर्शित आणि चौहान स्टुडिओज अंतर्गत कानू चौहान निर्मित, 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' हा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. यामध्ये सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय, सूरज पंचोली आणि नवोदित अभिनेत्री आकांक्षा शर्मा एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट भारतभर अनेक भाषांमध्ये १४ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com