Ashok Mama  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Mama : भैरवी कशी करणार संकटांवर मात? अशोक मामांच्या निर्णयामुळे मालिकेला धक्कादायक वळण, पाहा VIDEO

Ashok Mama serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत रोज नवीन संकट पाहायला मिळत आहे. यातून अशोक मामा आणि भैरवी कसे बाहेर पडणार, हे जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'अशोक मा.मा.' मालिकेत मामा मोठा निर्णय घेणार आहे. ज्याचा परिणाम घरातील सदस्यांवर होणार आहे.

'अशोक मा.मा.' मालिकेत भैरवीच्या आयुष्यात अडचणी वाढताना दिसणार आहे.

भैरवीला बिझनेसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

कलर्स मराठीवरील 'अशोक मा.मा.' (Ashok Mama) मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. भैरवीला कठीण काळात अशोक मामांचा खंबीर पाठिंबा मिळताना दिसत आहे. मालिकेत या आठवड्यात भैरवीच्या आयुष्यात एकामागून एक घडामोडी घडताना दिसत आहेत. कुटुंब, सोसायटी आणि बिझनेस अशा तिन्ही पातळ्यांवर दबाव वाढत आहे. एकीकडे बिझनेसचे स्वप्न साकार करण्याचा तिचा प्रयत्न तर दुसरीकडे सोसायटी आणि घरातील निर्माण होणारा तणाव या सगळ्यात भैरवीची खरी कसोटी लागली आहे.

भैरवीच्या या कठीण प्रवासात भैरवीच्या पाठीशी अशोक मामा अधिक ठाम आणि निर्धाराने उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. अशोक मामा त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय आणि ठाम भूमिका घेताना दिसणार आहे. ज्यामुळे कथानकाला नवे वळण येणार आहे. मामा केवळ भैरवीचा आधार ठरणार की त्यांच्या या भूमिकेमुळे घरात नवे वाद निर्माण होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'अशोक मा.मा.' मालिकेत भैरवीचा आत्मविश्वास, तिला कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींची मिळणारी साथ भैरवीला संकटांवर मात करायला मदत करणार आहे. सोसायटीतील काही लोकांची कारस्थाने सुरू असल्यामुळे पुढील काही दिवस मालिकेत तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळणार आहे. याचबरोबर भैरवीला मिळणाऱ्या धमक्या, घराभोवती वाढणारा तणाव, सोसायटीतील गुपिते, अनपेक्षित पाहुण्यांचा प्रवेश, पोलिस तपास यामुळे भैरवीची कसोटी आणखी कठीण होणार आहे.

भैरवी प्रत्येक पावलामागे अशोक मामांची ठाम साथ आणि विचारांची छाप कशी राहते आणि तिच्या बिझनेसच्या स्वप्नांचा प्रवास कोणत्या नव्या दिशेला वळतो हे प्रेक्षकांसाठी पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक भाग प्रेक्षकांसाठी नवे ट्विस्ट घेऊन येणार असून नाती, विश्वासघात, धमक्या आणि स्वप्नांसाठीची झुंज यात पाहायला मिळणार आहे. अशोक मा.मा.' मालिका कलर्स मराठी वाहिनीवर रात्री 8.30 वाजता प्रसारित होते. या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT