Kangana Ranaut on CJP: भाजपच्या लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी संसदेतील गोंधळ आणि CJP आंदोलनावर कठोर प्रतिक्रिया देत आंदोलनकर्त्यांना थेट निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
'CJPवाल्यांनो, तुमच्यात जर हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा. लोकशाहीमध्ये सरकार कसे चालवायचे, याचा निर्णय जनतेने निवडून दिलेल्या सरकारचाच असतो. आंदोलन करून किंवा दबाव आणून सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडणे योग्य नाही,' असे कंगना रणौत म्हणाल्या.
संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने 'नीट-यूजी २०२६' परीक्षेतील गैरव्यवहार आणि राम मंदिर देणगी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज काही काळासाठी थांबवावे करावे लागले. यावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाल्या की, संसद ही चर्चा आणि उत्तरदायित्वासाठी आहे, गोंधळ घालण्यासाठी नाही. संसदीय अधिवेशनाचा उद्देश प्रत्येक विषयावर सखोल चर्चा करणे आणि सरकारला उत्तरदायी धरणे हा आहे. विरोधकांनी त्यांचे प्रश्न सभागृहात मांडावेत, याला आमचा विरोध नाही. मात्र, सतत घोषणाबाजी करून कामकाज ठप्प करणे ही लोकशाहीसाठी योग्य पद्धत नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारमधील अधिकारी किंवा मंत्र्यांना हटवण्याच्या मागण्यांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. "कोणाला पदावर ठेवायचे किंवा हटवायचे, हा निर्णय सरकारचा अधिकार आहे. अशा मागण्यांसाठी सरकारवर दबाव टाकणे योग्य नाही. लोकशाहीमध्ये सरकारवर दडपशाही करून निर्णय बदलता येत नाही," असे त्या म्हणाल्या.
कंगना रणौत यांनी पुढे सांगितले की, सरकारच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आधी जनतेचा कौल मिळवावा. "जर तुम्हाला सरकार कसे चालवायचे हे ठरवायचे असेल, तर निवडणूक लढवा आणि जनतेचा विश्वास संपादन करा. लोकशाहीमध्ये सत्तेचा अधिकार मतदार देतात, आंदोलक नाही," असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
दरम्यान, संसदेतील गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना वारंवार शांत राहण्याचे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देण्याचे आवाहन केले. मात्र घोषणाबाजी सुरूच राहिल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कंगना रणौत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.