Cinema Lovers Day Saam Tv
मनोरंजन बातम्या

Cinema Lovers Day: फक्त ९९ रुपयांमध्ये पाहा बॉलिवूड- हॉलिवूड चित्रपट, २३ फेब्रुवारीला असं आहे तरी काय?

Buy Movie Ticket Only 99 Rs: देशातील प्रमुख मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेड ही खास ऑफर घेऊन आले आहेत. त्यासाठी तुम्ही या संधीचा फायदा करून घेऊ शकता आणि फक्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता.

Priya More

Bollywood And Hollywood Movie:

सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणे तुम्हाला आवडत असेल तर २३ फेब्रुवारीचा दिवस तुमच्यासाठी खूपच खास असणार आहे. २३ फेब्रुवारीला तुम्ही फक्त ९९ रुपयांमध्ये कोणताही चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. या दिवशी अतिशय स्वस्तामध्ये तुम्हाला चित्रपटाची तिकिटे मिळणार आहेत.

२३ फेब्रुवारी २०२४ हा 'सिनेमा लव्हर डे' (Cinema Lovers Day) आहे. या दिवशी तुम्ही तुमचा आवडता नुकताच रिलीज झालेला चित्रपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहू शकता. देशातील प्रमुख मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेड ही खास ऑफर घेऊन आले आहेत. त्यासाठी तुम्ही या संधीचा फायदा करून घेऊ शकता आणि फक्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता.

महत्वाचे म्हणजे, २३ फेब्रुवारीला यामी गौतमचा 'आर्टिकल 370', विद्युत जामवालचा'क्रॅक' आणि शइिवा चड्ढाचा 'ऑल इंडिया रँक' हे चित्रपट रिलीज होणार आहेत. पीव्हीआर-आयनॉक्सच्या ऑफरनुसार २३ फेब्रुवारीला रिलीज होणारे हे चित्रपट देखील तुम्ही फक्त ९९ रुपयांमध्ये पाहू शकता. त्याचसोबत तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये रिलीज झालेले शाहिद कपूरचा 'तेरी बातों में ऐसा लझा जिया', हृतिक रोशनचा 'फाइटर' आणि सई मांजरेकरचा 'कुछ खट्टा हो जाए' हे चित्रपट देखील ९९ रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे.

याशिवाय तुम्ही हॉलिवूड चित्रपटही फक्त ९९ रुपयांमध्ये पाहू शकता. नुकतेच रिलीज झालेले 'मॅडम वेब', 'द होल्डओव्हर्स' आणि 'बॉब मार्ले-वन लव्ह', 'मीन गर्ल्स' आणि 'द टीचर्स लाउंज' यासह हॉलीवूडमधील अनेक चित्रपट देखील तुम्हाला ९९ रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

तुम्ही मल्टीप्लेक्स चेनमधून फक्त ९९ रुपयांमध्ये तिकीट खरेदी करू शकता. या दिवशी प्रीमियम सिनेमा फॉरमॅट्स आणि रिक्लिनर सीटवरही मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. मल्टीप्लेक्स चेन PVR-INOX ला आशा आहे की 'सिनेमा लव्हर डे'ला मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात येतील आणि या उत्सवात सहभागी होतील.' सिनेमा चेनने रिक्लिनर सीटसाठी तिकिटाची किंमत १९९ रुपये इतकी कमी केली आहे आणि ज्या लोकांना IMAX, 4DX, MX4D आणि गोल्ड कॅटेगरीतील चित्रपटांचा अनुभव घ्यायचा आहे त्यांना तिकिटांच्या किमतीत सूट दिली जात आहे.

पीव्हीआर-आयनॉक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी सांगितले की, 'नॅशनल सिनेमा डे'च्या यशापासून प्रेरणा घेऊन आम्ही सिनेमा लव्हर डे साजरा करणार आहोत. भारतीय प्रेक्षकांसाठी हा दिवस खूप खास आहे. तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.' महत्वाचे म्हणजे, ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची ही ऑफर कर्नाटक वगळता देशातील इतर दक्षिण भारतीय राज्यांमध्ये उपलब्ध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT