CID SAAM TV
मनोरंजन बातम्या

CID : दया कुछ तो गडबड है! एसीपी प्रद्युमन समोरच अभिजीतनं दयावर झाडली गोळी, जय-वीरूमध्ये दुरावा

CID Promo : सीआयडीचा धमाकेदार प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एकमेकांचे जीवाभावाचे मित्र आता एकमेकांविरोधात पाहायला मिळणार आहेत.

Shreya Maskar

सर्वांचा आवडता शो सीआयडी (CID ) आता लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो तब्बल 6 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सीआयडीचा प्रोमो समोर आला आहे. यात अभिजीत, दया आणि एसीपी प्रद्युमन पाहायला मिळत आहेत. यांचा पहिला लूक पाहून चाहते शोसाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सीआयडीच्या प्रोमोची सुरुवातच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिजीत आणि दया डोंगराळ ठिकाणी जिथे खाली दरी आहे. अशा ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळत आहेत. दया-अभिजीतच्या मैत्रीचे किस्से गाजवणारी त्यांची फ्रेंडशिप कुठे तरी दूर गेलेली पाहायला मिळाली आहे. कारण प्रोमोमध्ये अभिजीत आणि दया एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. अभिजीतने दयावर गोळी झाडलेली प्रोमोमध्ये दिसत आहे. तर एसीपी प्रद्युमन हे सर्व थांबवण्यासाठी पुढे धाव घेत आहे. मात्र दया स्वतः हून अभिजीतला गोळी झाडायला सांगतो. एकेकाळी एकमेकांचे मित्र असलेले अभिजीत आणि दया आता एकमेकांचे शत्रू झाले आहेत.

सीआयडीचा हा नवा सीझन खूप ट्विस्टने परिपूर्ण असणार आहे. सीआडीने 2018मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल 20 वर्षे या शोने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोची पात्र आणि शो मधील डायलॉग आजही प्रेक्षक विसरू शकले नाही. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर खूप मजेशीर कमेंट केल्या आहेत. सीआयडीच्या प्रोमोवर प्रेक्षकांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एसीपी प्रद्युमन आणि त्यांची टीम काय नवा ट्विस्ट घेऊन येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत उघडा जॉइंट खातं अन् महिन्याला कमवा ₹8,633 रुपये

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT