Dharmaveer 2 OTT Release
Dharmaveer 2 OTT ReleaseSAAM TV

Dharmaveer 2 : धर्मवीर २ OTT वर; घरबसल्या पाहा 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट', कुठे बघता येणार सिनेमा?

Dharmaveer 2 OTT Release : 'धर्मवीर २' आता तुम्ही घरबसल्या पाहू शकता. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज झाला, जाणून घ्या.
Published on

प्रसाद ओक यांचा 'धर्मवीर २' (Dharmaveer 2) आता ओटीटीवरही रिलीज झाला आहे. 'धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता हा चित्रपट घरबसल्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

'धर्मवीर २' या चित्रपटाला एका महिन्यातच प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. 'धर्मवीर २' चा मुख्य अभिनेता प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ओटीटीवर (Dharmaveer 2 OTT Release) रिलीजची माहिती दिली आहे. 'धर्मवीर २' आता ZEE5 वर पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धर्मवीर २' हा 2024मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १.९२ कोटी रुपये कमावले. मीडिया रिपोर्टनुसार, 'धर्मवीर २'ने आता १५.५ कोटींच्या वर रुपये कमावले आहेत.

'धर्मवीर २'मध्ये प्रसाद ओक (Prasad Oak) आणि क्षितीज दाते (Kshitij Date) मुख्य भूमिकेत दिसत आहेत. 'धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले. हा चित्रपट शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ते ठाणे जिल्हाप्रमुख देखील होते.या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दातेने साकारली आहे. 'धर्मवीर २' चे दिग्दर्शन प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

Dharmaveer 2 OTT Release
Diljit Dosanjh : दिलजितच्या कन्सर्ट तिकिटांचा काळाबाजार; मुंबई, दिल्लीत ईडीची धाड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com