Dayanand Shetty CID Saam Tv
मनोरंजन बातम्या

CID Daya: दयाने केले हेअर ट्रान्सप्लांट, चाहत्यांसोबत शेअर केल्या वेदना

बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री नेहमीच आपल्या खास लूकने सर्वत्रच चर्चेत असतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या लूकची कॉपी चाहतेच काय इतर सेलिब्रिटीही करत असतात.

Chetan Bodke

Dayanand Shetty: बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री नेहमीच आपल्या खास लूकने सर्वत्रच चर्चेत असतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या लूकची कॉपी चाहतेच काय इतर सेलिब्रिटीही करत असतात. खासकरुन कपडे आणि हेअरस्टाइलकडे सर्वाधिक लक्ष देतात. एखादा सेलिब्रिटीसाठी आपल्या लूकची चर्चा होणे हे खास आहे. अशीच गोष्ट झाली आहे एका बॉलिवूड सेलिब्रिटीबाबतीत. तो दुसरा तिसरा कोणी नसून CID फेम दया आहे.

'दया दरवाजा तोड दो…' हा डायलॉग नक्कीच सर्वांना माहित आहे. सीआयडी फेम दया अर्थात दयानंद शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यंदा तो चर्चेत येण्याचे कारणच फार वेगळं आहे. सध्या खूप वेदना दया सहन करतोय. स्वतः दयाने याबाबत माहिती दिली आहे. दयानंद शेट्टीचे डोक्यावरील केस विरळ झाले आहेत. यामुळे तो फारच चिंतेत होता.

एखाद्या कलाकाराच्या डोक्यावर केस नसतील तर त्याच्यासाठी फार ती चिंतेची बाब आहे. कारण त्याच्यासाठी दिसणे हे फार महत्वाचे असते. यासाठी दयाने हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant) केले आहे. त्याने त्याच्या इस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर करत याबाबतचा अनुभव देखील सांगितला आहे.

दयाने या हेअर ट्रिटमेंटचा अनुभव सांगतो की, हेअर ट्रान्सप्लान्टवेळी अनेकांना अतिशय वेदना होतात, सूज येते असं घाबरवतात. पण मला असं काहीही झालेलं नव्हते. ट्रान्सप्लान्ट केल्यानंतर ज्या काही वेदना झाल्या, त्या काही दिवसांतच कमी झाल्या होत्या. पण ज्या ठिकाणी ही ट्रिटमेंट झाली तेवढा भाग सुन्न होतो.

आता त्याने औषधं घेणं बंद केले असून कधी तरी खूप त्रासदायक वेदना त्याला होतात. कधी चुकून डोक्याच्या त्याच भागात काही लागलं तर मात्र अतिशय वेदना होत असल्याचं तो म्हणाला. हेअर ट्रान्सप्लान्ट केल्यानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी डोळ्यांखाली सुज आली होती. इतर चेहऱ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे ही त्याने सांगितले. पुढे काही जर काही त्रास झाला आपल्या चाहत्यांसोबत शेअर करेन असंही तो म्हणाला.

दयानंद शेट्टी बद्दल थोडक्यात माहिती

दयानंद शेट्टी अर्थात दया टीव्ही इंडस्ट्रीतील अतिशय पॉप्युलर नाव आहे. दयानंद शेट्टीला सीआयडी कार्यक्रमातून दया या भूमिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली. या शोव्यतिरिक्त दया खतरो के खिलाडीमध्येही स्पर्धक होता. तो खतरो के खिलाडीच्या ५व्या सीजनमध्ये होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : रावणाच्या ऐवजी श्रीरामांचा पुतळा जाळला; कुठे घडला धक्कादायक प्रकार? पाहा व्हिडिओ

Green Coffee: वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफीचे सेवन योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Manoj Jarange: मराठा आरक्षण ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; मनोज जरांगे नेमकं काय काय म्हणाले? EXCLUSIVE VIDEO

Maharashtra Live News Update: रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २३ हजार मतदार बोगस मतदार

Indian Army Chief : यावेळी तुम्हाला नकाशावरून गायब करु, भारताच्या लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम

SCROLL FOR NEXT