मुंबई: चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित चित्रपट 'छेल्लो शो'मधील बालकलाकार राहुल कोळी याचं निधन झालं. त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या १५ व्या वर्षी राहुलनं अखेरचा श्वास घेतला. (Bollywood) (Bollywood Actor)
राहुल कोळी याचं कर्करोगामुळं निधन झालं. त्याच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून पाठवण्यात आलेल्या 'छेल्लो शो' या चित्रपटात राहुलनं बालकलाकार म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राहुलनं या जगाचा निरोप घेतलाय. ९५ व्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिल्म फिचर श्रेणीसाठी 'छेल्लो शो' चित्रपटाची निवड करण्यात आली होती. (Marathi Entertainment News)
राहुलचे वडील रिक्षा चालक आहेत. राहुलच्या निधनानं वडिलांना खूप मोठा धक्का बसला आहे. राहुल भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. रविवारी त्याला ताप आला होता. उलटीचा त्रासही त्याला झाला. त्यानंतर काही तासांतच त्याचं निधन झालं. आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा हा चित्रपट आयुष्यातील अखेरचा चित्रपट ठरेल असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. त्याचा तो शेवटचा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून त्याच दिवशी आम्ही हा चित्रपट बघणार आहोत, असं राहुलचे वडील म्हणाले.
'छेल्लो शो' चित्रपट ९५व्या ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. देशभरातील ९५ चित्रपटगृहांत तो प्रदर्शित होणार आहे. तुम्ही हा चित्रपट १०० रुपयांत पाहू शकणार आहात. चित्रपटाचे दिग्दर्शक पान नलीन आहेत. गुजराती चित्रपट छेल्लो शो ऑस्कर २०२३ साठी पाठवण्यात आला आहे. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म श्रेणीसाठी पाठवण्यात आला आहे. चेन्नईमध्ये नुकतेच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.