chhaava  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhaava OTT Release : 'छावा' ओटीटीवर येताच प्रेक्षकांची नाराजी; व्यक्त केली खंत, नेमकं कारण काय?

Chhaava Audience Disappointed : नुकताच 'छावा' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. मात्र ओटीटीवर चित्रपट रिलीज झाला असूनही प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. याचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशलच्या 'छावा'(Chhaava ) चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता हा चित्रपट घरबसल्या पाहता येत आहे. तरी देखील चाहते नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. 'छावा' चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'छावा' चित्रपटातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट काल (11 एप्रिल 2025) ला ओटीटीवर रिलीज झाला. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येत आहे. मात्र 'छावा' ओटीटीवर येऊनही चाहते नाराज आहेत. याचे कारण असे की, 'छावा' फक्त हिंदी भाषेत ओटीटीवर उपलब्ध आहे. मात्र 'छावा' थिएटरमध्ये तेलुगू भाषेतही रिलीज झाला होता.

'छावा' मात्र ओटीटीवर फक्त हिंदी भाषेत 'छावा' पाहता येत असल्याने तेलुगू प्रेक्षक नाराज झाले आहेत. त्यामुळे हिंदीनंतर 'छावा' ओटीटीवर तेलुगू भाषेत पाहता यावा अशी प्रेक्षकांनी आशा व्यक्त केली आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला. 'छावा' चित्रपटाने खूप कमी वेळात उंच शिखर गाठले आहे.

'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' हा 2025 चा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. 'छावा' चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळाला. तर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईची भूमिकेत दिसली. औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. चित्रपटात अनेक मराठी कलाकारही झळकले आहे. मराठी अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी ही भूमिका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT