Chhaava Movie Satara 110 Well Shoot Scene  SaamTV
मनोरंजन बातम्या

Chhaava Movie : छावा चित्रपटातील तो सर्वात 'भारी' सीन कुठे शूट झालाय? महाराष्ट्रातील ११० फूट खोल विहीर कुठंय?

Chhava Movie Shivling Pooja Scene : गुप्त विहीरीत भव्य राजवाडा आहे. सातारा जिल्ह्यातील लिंब या गावामध्ये जवळपास ही अनोखी विहीर आहे. लिंब हे गाव साताऱ्यापासून १६ किमी आणि पुण्यापासून १९ किमी अंतरावर आहे.

Prashant Patil

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं असलेल्या सुंदर लोकेशन्सवर या चित्रपटाचे शुटींग झाले आहे. छावा चित्रपटातील लक्षवेधी सीन महाराष्ट्रातील ११० फूट खोल विहीरीत असलेल्या गुप्त राजवाड्यात शूट झालाय. नेमकं हे ठिकाण कुठे आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

अभिनेता विकी कौशलने सिनेमात संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या अभिनयाने मांडण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. अभिनेता विकी कौशल याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटात एका सीनमध्ये अभिनेता विकी कौशल एका मोठ्या शिवलिंगसमोर पूजा करताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील हा सीन पाहायला मिळतो. हा सीन जिथे शूट झालाय ती ऐतिहासीक वास्तू महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. बारा मोटेची विहीर असं या वास्तूचं नाव आहे.

गुप्त विहीरीत भव्य राजवाडा आहे. सातारा जिल्ह्यातील लिंब या गावामध्ये जवळपास ही अनोखी विहीर आहे. लिंब हे गाव साताऱ्यापासून १६ किमी आणि पुण्यापासून १९ किमी अंतरावर आहे. ३०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही ऐतिहासिक विहीर ही बारा मोटेची विहीर या नावाने ओळखली जाते. या विहिरीत चक्क एक महाल बांधण्यात आला. या विहीरीचे एणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या ३०० वर्षात ही विहीर कधीही कोरडी झाली नाही.

छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित छावाच्या गर्जनेने बॉक्स ऑफिस हादरुन गेलंय. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा नवा उच्चांक गाठलाय. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत ३१ कोटींचा गल्ला जमवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

SCROLL FOR NEXT