Chhaava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhaava : छत्रपती संभाजी महाराजांचा 'छावा' फ्रीमध्ये एक लाख नागरिकांना दाखवणार

Chhaava Free Shows : सध्या सर्वत्र छावा चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहे. दरम्यान राज्यातील एका बड्या नेत्याने एक लाख नागरिकांना फ्रीमध्ये छावा चित्रपट दाखवणार असल्याचा संकल्प केला आहे.

Yash Shirke

Chhaava Movie : सध्या सर्वत्र छावा सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असून,अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. अनेक ठिकाणी सकाळी आणि मध्यरात्री चित्रपटाचे शो लावण्यात येत आहे. याच दरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांच्या तर्फे एक लाख नागरिकांना छावा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.

देशासह राज्यात छावा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावं अशी मागणी केली जातं आहे.अश्यातच विविध पक्ष तसेच संघटनाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हे नागरिकांना आत्ता मोफत दाखविण्यात येत आहे.अश्यातच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तर्फे कोथरूड मतदार संघातील एक लाख नागरिकांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे देखील आपलं दैवत आहे. धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान देऊन एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा हा प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे.त्यामुळे कोथरूड मतदारसंघातील किमान एक लाख नागरिकांना छावा सिनेमा मोफत दाखविण्याचा प्रयत्न आहे." अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या सिनेमात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारत असून,दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘छावा’मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT