Chhaava Movie Create History Saam tv
मनोरंजन बातम्या

Chhaava Movie Create History: आया रे तुफान...; 'छावा'ची सिंहगर्जना थेट लंडनमध्ये; चित्रपटाने रचला नवा इतिहास

Chhaava Movie: ए.आर. रहमान यांच्या 'आया रे तूफान' या गाण्याने लंडनच्या वेस्टमिन्स्टर पॅलेस आणि न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरला उजळून टाकले आहे. तसेच छावा चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे.

Shruti Vilas Kadam

Chhaava Movie Create History: 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे आणि यावेळी या चित्रपटाने इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच लंडनच्या पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टरला एका आश्चर्यकारक बॉलिवूड कॅनव्हासमध्ये रूपांतरित करण्यात आले. एवढच नाही तर खास लाईट शो आणि मोठ्या प्रोजेक्टरवर छावा चित्रपटातील ए.आर. रहमान यांचे 'आया रे तुफान' हे गाणे वाजवण्यात आले.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता, कारण 'छावा' चित्रपटातील 'आया रे तुफान' हे गाणे जागतिक व्यासपीठावर आपली छाप सोडत आहे. जे भारतीय सांस्कृतिचे जागतिक स्तरावर प्रतिनिधीत्व करत आहे. ही माहिती मॅडडॉकच्या अधिकृत X अकाउंटवरून मिळत आहे.

'आया रे तुफान' या चित्रपटाने न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरही आपला ठसा उमटवला आहे. जिथे प्रसिद्ध नृत्यांगना लॉरेन गॉटलीब आणि एका प्रतिभावान पथकाने चित्रपटातील या गाण्याचे उत्तम रित्या सादरीकरण करत या गाण्यावर वेगळी छाप सोडली.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित 'छावा' हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना प्रभावित करत आहे, याचे मुख्य कारण विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची उत्तमरीत्या साकारलेली भूमिका आहे. शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीवर आधारित, हे ऐतिहासिक नाटक या वर्षीच्या सर्वात उत्तम रिलीज ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No Onion Recipes: ना बटाटा–ना कांदा! तरीही चव अफलातून; करून पाहा या सोप्या आणि चटपटीत भाज्यांची रेसिपी

Ladki Bahin Yojana: राज्यात लाडक्या बहिणींना १ लाखाचं अनुदान अन् वीजबिल माफी, सरकारची मोठी घोषणा| VIDEO

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांची तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील जाहीर सभा रद्द

Vastu Tips: या पर्सनल गोष्टी इतरांसोबत कधीही शेअर करू नका, अन्यथा...

Eyebrows Shape: आयब्रो करायला पार्लरमध्ये जायची काय गरज? परफेक्ट आकाराच्या भुवयांसाठी करा 'हा' सोपा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT