Chhaava Movie Controversy Google
मनोरंजन बातम्या

Chhaava Movie Controversy: वादग्रस्त सीन काढणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर 'छावा'च्या दिग्दर्शकांचा मोठा निर्णय

Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनामुळे सुरु झालेला वाद आखेल संपणार आहे.

Shruti Vilas Kadam

Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. 'छावा' या चित्रपटाचे लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शन केले असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ट्रेलर मधील संभाजी महाराजांना लेझीम खेळत नाचताना दाखवल्यामुळे चाहते नाराज होते. त्यामुळे सीन काढण्यासाठी आंदोलन देखील करण्यात आले. आता या वादावर पूर्णविराम लावत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी तो सीन चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेलर मधील वादग्रस्त सीनवर तोडगा काढण्यासाठी आज लक्ष्मण उतेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी तो सीन काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. उतेकर म्हणाले, "आज राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला. त्यांच वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहासाची माहिती आहे. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरही खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमका काय बदल करावा? हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. त्यांनी मला काही सूचना केल्यात. तसेच काही बदल करण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे ज्या सीन्सवरुन वाद सुरू आहेत, ते सीन आम्ही डिलीट करणार आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.

छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज नाचतानाचा सीन का शूट केला? या प्रश्नाचे उत्तर देताना उतेकर म्हणाले, “आम्ही लेखक विश्वास पाटील यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट बनवला आहे. आम्ही या कादंबरीचे हक्क खरेदी केले आहेत.आम्ही गेल्या चार वर्षांपासून सतत या चित्रपटावर काम करत आहोत. इतिहासाला वेगवेगळे पैलू असतात. छावा कादंबरीत लिहिलं आहे की संभाजीराज्यांना होळीचा उत्सव साजरा करायला आवडायचे. संभाजीराजे होळीच्या आगीतून नारळ बाहेर काढायचे. त्यामुळे आम्ही संभाजी महाराजांना लेझीम खेळताना दाखवलं आहे. लेझीम हा आपला पारंपरिक खेळ आहे. प्रेक्षकांना लाज वाटेल असं कोणताही सीन चित्रपटात नाही”.

या चित्रपटातील वादग्रस्त सीन काढल्यावर सुरु असलेला वाद लवकरच मिटेल अशी अपेक्षा. दरम्यान, विकी कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट पुढील महिन्यात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आता हा चित्रपट किती आवडतो हे पाहणे रंजक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT