Santosh Juvekar Video saam tv
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekar Video : संतोष जुवेकरचा रॉयल अंदाज; नवीन वर्षात खरेदी केली लग्जरी कार, VIDEO शेअर करत म्हणाला- "देखोना guysss देखोना..."

Santosh Juvekar Buy Luxury Car : मराठी अभिनेता संतोष जुवेकरने नवीन वर्षाच्या सुरुवातीला लग्जरी कार खरेदी केली आहे. त्याने व्हिडीओ शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

अभिनेता संतोष जुवेकरला 'छावा' चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली.

नवीन वर्षात संतोषने लग्जरी कार खरेदी केली आहे.

अभिनेत्याने आलिशान कारची झलक व्हिडीओ शेअर करून दाखवली आहे.

2025 मराठी अभिनेता संतोष जुवेकरसाठी खूपच खास ठरले. या वर्षाची सुरुवात त्याच्या 'छावा' चित्रपटाने झाली. 'छावा' मुळे संतोष जुवेकरला खूप लोकप्रियता मिळाली. तसेच काही प्रमाणात ट्रोलिंगला देखील समोर जावे लागले. मात्र संतोष जुवेकरचा अभिनय चाहत्यांना प्रचंड आवडतो. त्याने आजवर मराठी, हिंदी चित्रपट आणि मराठी मालिकांमध्ये दमदार काम केले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

मराठमोळ्या संतोष जुवेकरने आलिशान, लग्जरी, नवीकोरी कार खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ शेअर करून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. संतोष जुवेकरच्या घरी थार रॉक्स ही गाडी आली आहे. अभिनेता खूपच खुश पाहायला मिळते आहे. व्हिडीओत संतोष गाडीची पूजा करताना दिसत आहे. तसेच त्याच्या लग्जरी कारची झलक पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाची रॉयल कारमध्ये बसून संतोष जुवेकर आता प्रवास करणार आहे.

कारची किंमत किती?

संतोष जुवेकरने महिंद्रा थार ROXX ही लग्जरी कार खरेदी केली आहे. या गाडीची मार्केट किंमत 12.25 लाख ते 22.06 लाखपर्यंत आहे. व्हेरिएंटनुसार कारची किंमत बदलत जाते.

संतोष जुवेकरची पोस्ट

संतोष जुवेकरने पोस्टला खूपच हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "देखोना guysss देखोना! आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने आणि तुम्हां सर्वांच्या प्रेम- शुभेच्छांमुळे नवीन वर्षात पेटीपॅक गाडी घेतली महाराजा... आता प्रवासही नव्याने सुरू...चांगभलं...बाप्पा मोरया! " चाहते आणि कलाकार त्याच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. तसेच त्याचे कौतुक देखील करत आहे.

वर्कफ्रंट

संतोष जुवेकरने 'छावा' चित्रपटात रायाजीच्या भूमिकेत झळकला. अलिकडेच त्याचे 'घाशीराम कोतवाल' नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. चाहते आता त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. संतोष जुवेकरने आजवर मोरया, झेंडा असे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Choclate Tea Recipe: आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय? मग हे 3 कॅफेस्टाईल चहा नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update : महापालिका प्रचाराला वेग, राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात

SBI Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय स्टेट बँकेत नोकरी, पॅकेज ४४ लाख; ९९६ जागांसाठी भरती; आजच अर्ज करा

Kitchen Hacks : बटाटे उकडताना कुकर काळपट पडतोय? मग वापरा या भन्नाट ट्रिक्स

काका पुतण्याचे एकमेकांना आव्हान! पुण्यातील प्रभाग ९ मध्ये होणार "काटे की टक्कर"

SCROLL FOR NEXT