Chhaava Worldwide Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Worldwide Collection : 'छावा'ची जगभरात गर्जना! लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा, वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

Chhaava Box Office Collection Day 5: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. 'छावा' ने जगभरातही तुफान कमाई केली आहे.

Shreya Maskar

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava ) चित्रपटाची दिवसेंदिवस क्रेझ वाढताना पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळत आहेत. तर चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

  • पहिला दिवस - 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • एकूण - 165 कोटी रुपये

'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. 'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' चित्रपटाने चार दिवसांत सिनेमाचे बजेट वसूल केले आहे. 'छावा'ने आतापर्यंत वर्ल्डवाइड 195.60 कोटींचा व्यवसाय केला आहे.

२०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच दाखल होणार

'छावा' ची वाढती क्रेझ 'पुष्पा 2' लाही मागे टाकत आहे. आता 'छावा' चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल हेणार आहे. लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' चित्रपट एक तुफान आहे. येत्या दोन दिवसात चित्रपट २०० कोटींचा टप्पा गाठणार असल्याचे चित्र दिसत आहे. 'छावा' ने अनेक मोठ्या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.

'छावा' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 5 कोटी कमावले होते. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे. विकी कौशलचा दमदार अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT